भाजप - म.गो. युती तुटणे अशक्य

By admin | Published: September 3, 2016 09:07 PM2016-09-03T21:07:59+5:302016-09-03T21:07:59+5:30

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि म.गो. यांच्यातील युती तुटणार नाही हे आता अधिक स्पष्ट होऊ लागले आहे

BJP - MG The alliance is impossible to break | भाजप - म.गो. युती तुटणे अशक्य

भाजप - म.गो. युती तुटणे अशक्य

Next
>- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 3 - सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि म.गो. यांच्यातील युती तुटणार नाही हे आता अधिक स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी युती तुटणार नाही याची सगळी खबरदारी घेतली असल्याची माहिती शनिवारी भाजपच्या उच्चस्तरीय सुत्रंनी दिली.
संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बंड पुकारल्यामुळे व भाभासुमंने थेट म.गो. पक्षाला साद घातल्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतेही अधिक सतर्क व सावध झाले. नितीन गडकरी यांच्याकडे भाजपने येत्या निवडणुकीसाठी जबाबदारी सोपवलेली असल्याने गडकरी यांचे काम वाढले आहे. गडकरी, संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर व अन्य नेते सतर्क बनले व त्यांनी भाजप-म.गो. युती पुढील आणखी पाच वर्षे अबाधित राहिल याची काळजी घेतली आहे. गडकरी यांच्या माध्यमातून गोव्यात सार्वजनिक बांधकाम खाते हजारो कोटींची विकास कामे करत आहे. त्या कामांमध्ये खंड पडायचा नसेल तर म.गो.ने भाजपसोबत राहणो गरजेचे आहे, असा विचार म.गो.च्या केंद्रीय समितीमधीलही काहीजण करू लागले आहेत. भारतीय भाषा सुरक्षा मंचला यापूर्वी म.गो.ने तात्त्विक पाठींबा दिलेला आहे पण भाजपशी युती तोडून थेट रणांगणात उतरण्याची म.गो.ची तयारी नाही व केंद्रात भाजप सत्तेत असेर्पयत म.गो.ला ते परवडणारेही नाही याची कल्पना भाजपच्या काही मंत्र्यांनाही आहे. यापूर्वी म.गो.शी युती तोडा अशी मागणी भाजपचे काही आमदार करत होते पण आता बदलत्या राजकीय स्थितीत त्यांचीही बोलती बंद झाली आहे. 
 
कोकण प्रांताचा तळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे काही महत्त्वाचे पदाधिकारी गेले चार दिवस गोव्यात होते. शनिवारी सायंकाळी ते माघारी गेले. वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली संघ पदाधिकारी, स्वयंसेवक यांनी मिळून केलेले बंड व गोव्यात स्थापन झालेला नवा रा. स्व.  संघ या पाश्र्वभूमीवर कोकण प्रांताच्या पदाधिका:यांनी चार दिवस राज्यभर प्रवास केला. बंडखोरांचा नवा संघ हा आमचा नव्हे आमचा संघ हा मूळ संघ असून त्या मूळ संघाची साथ सोडून कुणीच वेलिंगकर यांच्या संघात सामिल होऊ नये म्हणून कोंकण प्रांत पदाधिका:यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना हवे त्या प्रमाणात यश आलेले नाही. वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील संघाच्या गेल्या तीन दिवसांत स्वतंत्रपणो पणजीत अनेक बैठका पार पडल्या व पुढील रणनीती आखली गेली.
 

Web Title: BJP - MG The alliance is impossible to break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.