कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:06 PM2023-05-06T18:06:39+5:302023-05-06T18:07:28+5:30

उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत, राणेंचा निशाणा.

bjp minister narayan rane targets uddhav thackeray barsu refinery project konkan matoshri sanjay raut | कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

googlenewsNext

सध्या कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून विरोध सुरू आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. बारसू रिफानरीवरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, आता यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची माहिती घ्या, असा सल्ला दिलाय.

“कोकणचा कॅलिफोर्निया करू असं हे लोक म्हणत होते, कॅलिफॉर्नियात काय आहे याची उद्धव ठाकरेंनी माहिती घ्यावी. कॅलिफोर्नियामध्ये रिफायनरीचे १४ प्रकल्प आहेत. तिकडे निसर्ग नाही? मग इकडेच विरोध का? मी काँग्रेसकडून मंत्री असताना असतानाही १० हजार मेगावॅटचा प्रकल्प बंद करण्याची मागणी करण्यात आली. वृत्तपत्रात बातमी आली मातोश्रीत कोळशापासून वीज उत्पादन करणारे ३४ वीज उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले, जैतापुरचा प्रकल्प सुरू करू नका, तो झाला तर आमचे कारखाने बंद पडतील, आम्हाला योग्य दर मिळणार नाही, तोट्यात जाऊ असं होतं. नंतर नेहमीप्रमाणे ५०० कोटी द्यायचं ठरलं आणि ॲडव्हान्स ५ कोटी,” असं नारायण राणे म्हणाले. 

“राऊत काय म्हणतात नारायण राणे त्यांना घेऊन आले होते. अर्धे नारायण राणेंना अर्धे उद्धव ठाकरेंना. त्यांना माहित नाही का मातोश्रीत गेलेल्या पैशाची वाटणी कधी होते का? तिकडे इनकमिंग आहे, आऊटगोईंग नाही. मी तेव्हा काँग्रेसमध्ये मंत्री होतो, मी त्यांना २५० कोटी का देईन. उद्धव ठाकरे, संजय राऊत मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलतायत,” असं वक्तव्य त्यांनी केलं.

कोकणाच्या विकासात योगदान नाही
“महाराष्ट्रात इतके नेते आहेत, प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. एनरॉन, जैतापूरला विरोध, हायवेला, सिंधुदुर्गात विमानतळ आलं जागा घेण्याच्या प्रक्रियेलाही विरोध, आजवर कोकणातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केलाय. कोकणाबद्दल आस्था, प्रेम आहे की द्वेष आहे. यांनी गेल्या अडीच वर्षात कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही. यांचं कोकणाच्या विकासात योगदान काही नाही,” असा आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
इतके प्रकल्प बाहेर नेले. आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या. आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या. कोकणात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे अजिबात चालणार नाही. इथल्या पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. या प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जा. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरांवर वरवंटा फिरवताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

Web Title: bjp minister narayan rane targets uddhav thackeray barsu refinery project konkan matoshri sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.