भाजपाच्या आमदाराने मागितली लाच, आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांची ऑडिओ क्लीप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 10:30 PM2017-09-07T22:30:00+5:302017-09-08T05:09:34+5:30
भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देणाऱ्या भाजपाच्या आमदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. भाजपाचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदारसंघातील आमदार राजू तोडसाम यांनी एका ठेकेदाराकडे अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याचे समोर आले आहे.
यवतमाळ, दि. ७ -आर्णी-केळापूर मतदारसंघाच्या भाजपा आमदाराने आपल्या मतदारसंघात कामे करणाºया कंत्राटदाराला मोबाईलवरून ‘रॉयल्टी’ची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संभाषणाची आॅडिओ क्लीप गुरुवारी व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी बुधवारी दुपारी ९३७२०७९५९५ या क्रमांकाच्या मोबाईल फोनवरून शिवदल लखीमचंद शर्मा, रा. सत्यनारायण ले-आऊट यवतमाळ, यांच्या ९४२२१६८९७८ या मोबाईल क्रमांकावर फोन केला. शर्मा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला. सुरूवातीला आमदारांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. कामाची बिले का थांबली, अशी विचारणा केली. त्यावर कंत्राटदाराने बिले का थांबली, असे विचारताच बांधकामच्या अधिकाºयांनी सांगितले नाही काय, माझ्या मतदारसंघात काम करायचे असेल, तर माझे काम करावेच लागेल, असा दम शर्मा यांना भरला. शर्मा यांनी माझा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाल्याने तो कोमात आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही, असे उत्तर दिले. तसेच पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे तक्रार करतो, असे म्हणताच आमदार भडकले. त्यांनी पालकमंत्रीच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांकडे जा, अशा शब्दात शर्मा यांना दम भरला.
शर्मा यांनी केळापूर मतदार संघातील पांगडी, दडपापूर, घोटी, उमर पोड येथे रस्ता डांबरीकरण, घाट कटिंग, अशी ४५ लाखांची कामे केली. या कामांची काही देयके बांधकाम विभागाने दिली. उर्वरित देयके थांबविण्यात आली. ही देयके हवी असतील तर माझे काम करा, असा फोन त्यांना आल्याचे या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकायला येते.
दुपारी ९३७२०७९५९५ या क्रमांकाच्या मोबाईल फोनवरून शिवदल लखीमचंद शर्मा, रा. सत्यनारायण ले-आऊट यवतमाळ, यांच्या ९४२२१६८९७८ या मोबाईल क्रमांकावर फोन केला. शर्मा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला. सुरूवातीला आमदारांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. कामाची बिले का थांबली, अशी विचारणा केली. त्यावर कंत्राटदाराने बिले का थांबली, असे विचारताच बांधकामच्या अधिकाºयांनी सांगितले नाही काय, माझ्या मतदारसंघात काम करायचे असेल, तर माझे काम करावेच लागेल, असा दम शर्मा यांना भरला. शर्मा यांनी माझा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाल्याने तो कोमात आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही, असे उत्तर दिले. तसेच पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे तक्रार करतो, असे म्हणताच आमदार भडकले. त्यांनी पालकमंत्रीच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांकडे जा, अशा शब्दात शर्मा यांना दम भरला.
शर्मा यांनी केळापूर मतदार संघातील पांगडी, दडपापूर, घोटी, उमर पोड येथे रस्ता डांबरीकरण, घाट कटिंग, अशी ४५ लाखांची कामे केली. या कामांची काही देयके बांधकाम विभागाने दिली. उर्वरित देयके थांबविण्यात आली. ही देयके हवी असतील तर माझे काम करा, असा फोन त्यांना आल्याचे या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकायला येते.या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत आ.राजू तोडसाम यांच्याशी संपर्क केला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते.
संघटना आंदोलनाच्या तयारीत
शर्मा यांच्या समर्थनार्थ कंत्राटदार कल्याण संघटना पुढे सरसावली आहे. संघटनेच्या कार्यालयात उपाध्यक्ष संतोष देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी अशी अडचण कधीच आली नाही. आता तर काम करणेच अवघड झाल्याची भावना कंत्राटदारांनी व्यक्त केली. या अन्यायाविरूद्ध कंत्राटदार संघटना बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले.