Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे सुद्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला माहिती नव्हतं”; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:41 PM2022-11-17T18:41:03+5:302022-11-17T18:41:39+5:30

Maharashtra News: महाराष्ट्रात सुद्धा छोटे मोठे पप्पू आहेत हो, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.

bjp mla atul bhatkhalkar replied shiv sena uddhav thackeray over criticism on dcm devendra fadnavis | Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे सुद्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला माहिती नव्हतं”; भाजपचा पलटवार

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे सुद्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला माहिती नव्हतं”; भाजपचा पलटवार

Next

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. भाजप, शिंदे गट आणि मनसे या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. 

ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, आज ते धोक्यात आले म्हणून आम्ही लढा सुरू केला आहे. एकत्र आलो आहोत. जो पांचटपणा सुरू केला आहे, तो त्यांनी बंद करावा, पहिल्या आपल्या संस्थेचे स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे, ते सांगावे मग पुढे बोलावे. त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये, या शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

महाराष्ट्रात सुद्धा छोटे मोठे पप्पू आहेत हो

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे सु्द्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला नव्हतं. महाराष्ट्रात सुद्धा छोटे मोठे पप्पू आहेत हो, असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे,  उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. सावरकरांचे देशासाठीचे योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे. 

दरम्यान, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत घेतलेल्या सहभागावरून टीकास्त्र सोडले आहे. सर्वांत दुर्देवाची बाब ही आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीही कधी सावरकरांचा अपमान सहन केला नाही. त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सावरकारांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेत आहेत. ही कशी विचारसरणी आहे, असा सवाल करत, भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटके बंद करा, या शब्दांत राम कदम यांनी हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp mla atul bhatkhalkar replied shiv sena uddhav thackeray over criticism on dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.