Nawab Malik Sameer Wankhede Case: "लवकरच तुरुंगात बसून..."; भाजपा आमदाराने लगावला नवाब मलिकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:22 AM2022-02-01T09:22:04+5:302022-02-01T09:34:25+5:30
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
Nawab Malik Sameer Wankhede Case | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद साऱ्यांनीच पाहिला. गेल्या महिन्याभरापासून हे प्रकरण थोडंसं शांत झालं असतानात आता या प्रकरणात एक ट्विट्स आला आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर आता आयोगाने पुढील ७ दिवसांच्या आत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. या मुद्द्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मलिकांना टोला लगावला.
समीर वानखेडेंनी आयोगात केलेल्या तक्रारीत नमूद केलं होतं की, नवाब मलिकांनी त्यांच्यावर मानसिक अत्याचार केले. त्यांच्या धर्माबाबात आणि जातीबाबत सातत्याने उल्लेख करत त्यांना त्रास दिला. त्यामुळे या तक्रारीनंतर आयोगाने नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरूनच भाजपाने त्यांना टोला लगावला. "लवकरच तुरुंगात बसून पत्रकार परिषदा होतील असे दिसते...", असा एका वाक्यात अतुल भातखळकर यांनी मलिकांना टोला लगावला.
लवकरच तुरुंगात बसून पत्रकार परिषदा होतील असे दिसते...https://t.co/efQq1Mdhkg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 31, 2022
दरम्यान, समीर वानखेडे गेल्या वर्षीपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये होते. तेव्हा एका कारवाईमध्ये त्यांनी नवाब मलिकांच्या जावायाला ड्रग्स प्रकरणात अटक केली. जावई जेलमधून सुटल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या जाती आणि धर्माबद्दल प्रश्न विचारत संशयाचं वातावरण तयार केलं. त्यांच्या वडिलांच्या नावाबाबत प्रश्न उपस्थित केले. इतकंच नव्हे तर समीर वानखेडे यांची पहिली पत्नी हिच्याबाबतही काही मुद्दे मांडले. आणि महत्त्वाचे म्हणजे समीर वानखेडे मुस्लीम आहेत असा आरोप मलिकांनी केला. वानखेडेंनी महार जातीचं बनावट प्रमाणपत्र बनवलं असून त्याच आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचाही आरोप त्यांनी केला होता.