"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:54 PM2020-08-27T15:54:57+5:302020-08-27T16:17:28+5:30

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर भाजपाने निशाणा साधला आहे. 'मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा' असं भाजपाच्या आमदाराने म्हटलं आहे.

bjp mla atul bhatkhalkar wrotes letter to narendra modi over parambir singh | "मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र

"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र

googlenewsNext

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. चौकशीदरम्यान रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर भाजपाने निशाणा साधला आहे. 'मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा' असं भाजपाच्या आमदाराने म्हटलं आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी परमबीर सिंह यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे. 

"सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध माहितीच्या आधारावर चौकशीची परवानगी दिली. मात्र मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नाही आणि त्यामुळे न्यायावर परिणाम झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. अनेक बाबी समोर येऊनही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही', असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. तसेच 'देशाच्या आर्थिक राजधानीतील जनहिताचं प्रकरण असल्यामुळे आपली माफी मागत हस्तक्षेप करत आहे. सध्या चर्चेत असलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली आणि एफआयआर वैध ठरवला. मुंबई पोलिसांनी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या तपासात कोणतीही प्रगती केली नव्हती' असं देखील भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे. 

बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळे परमबीर सिंह हे कोणाला तरी क्लीनचिट देण्यासाठी उत्सूक असल्याचं स्पष्ट होतं असं देखील भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात 65 दिवस कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. कोरोना चाचणीविनाच मृतदेहाचं ऑटोस्पाय करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून दबाव होता, असं डॉक्टरांनी म्हटल्याचा दावा काही वृत्तात करण्यात आला आहे असं म्हणत कलम 311 (2)(ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात असं भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

अतुल भातखळकर यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यात त्यांनी ''अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे'' असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी

'चीनसोबत युद्ध झालं तर पाकिस्तानशीही युद्ध निश्चित', पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

"केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक"; कोरोना लसीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल म्हणाले...

पुरावे नष्ट करण्याचा रियाचा प्रयत्न?, सुशांतचं घर सोडण्याआधी 8 हार्ड डिस्कमधला डेटा केला डिलीट

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! देशात 10 दिवसांत तब्बल 10,000 जणांचा मृत्यू; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

Web Title: bjp mla atul bhatkhalkar wrotes letter to narendra modi over parambir singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.