...तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीची महापूजा का करावी? आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:28 PM2020-06-24T17:28:11+5:302020-06-24T17:34:10+5:30
यंदाच्या वारीला सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर वादात अडकलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आता मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली आहे. दरवर्षी प्रथापरंपरेनुसार आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पुजेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पांडुरंगाची महापूजा करु नये असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.
याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाचं संकट आहे, कोरोनामुळे पंढरपुरात बाहेरील लोक, महाराज मंडळींना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी का करावी? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतून येऊ नये असं त्यांनी सांगितले आहे.
त्याचसोबत यंदाच्या वारीला सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्याचसोबत धनगर समाजाला भाजपा सरकारने तरतूद केलेले १ हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारनं दिले नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
शरद पवारांवरील टीकेनं वादंग
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं ते म्हणाले, त्यामुळे पडळकरांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांना राज्यभरात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भरात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील असं फडणवीस म्हणाले. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी जायचं असेल तर त्यांना जाऊ दिलं पाहिजे. विठ्ठल आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना संपूर्ण आध्यात्मचा राजा म्हणतो. मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे हा मुख्यमंत्र्याचा मान नाही, तर हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की, आमच्या राजाची त्यांनी पूजा केली पाहिजे अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार; कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पाकची खुमखुमी मिटणार नाही; चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध षडयंत्र?
बाबा रामदेव यांनी लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' औषधात आणखी एक झोल; पतंजलीला नोटीस
जाणून घ्या, १ जुलैपासून बदलणार बँकांचे नियम; माहिती नसेल तर होईल तुमचं आर्थिक नुकसान
हिंदुजा भावांमध्ये 'त्या' एका पत्रावरुन वाद; तब्बल ८३ हजार कोटींच्या संपत्तीचं प्रकरण कोर्टात
तब्बल ९ वर्ष तपस्या करुन मुस्लीम युवकासह कुटुंबातील ३५ सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म