केंद्र सरकारला भाजपा आमदार जयकुमार रावल यांचाच घरचा आहेर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 04:16 PM2023-09-16T16:16:47+5:302023-09-16T16:23:52+5:30
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या समोरच खासदार भामरेंना सुनावलं
Jayakumar Rawal, केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण धोरणाला भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या जमिनींना योग्य मोबदला द्या अन्यथा धुळे ते नरडाणा रेल्वे नाही तरी असे खडे बोल जयकुमार रावल यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोरच खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सुनावले. धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी व धुळे नरडाणा रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जात आहेत. मात्र या जमिनींना योग्य मोबदला दिला जात नसल्याने आमदार जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण धोरणाला विरोध दर्शविला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला.
यावेळी आमदार जयकुमार रावल म्हणाले की दोन लाखात तर शिंदखेड्यात प्लॉटही मिळत नाही अन् शेतकऱ्यांच्या जमिनींना हेक्टरी पाच लाख रुपयाचाच भाव लावतात त्यामुळे प्रकल्पांसाठी शेतकरी कशाला आपल्या जमिनी देतील. आणी म्हणून खासदार साहेब तुमचा पंतप्रधान कार्यालयाशी तगादा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळून द्यावा. एकीकडे शेतीसाठी पाणी येणार असल्याचे स्वप्न दाखवून अन् शेतकऱ्यांजवळ जमिनीत राहणार नाही त्याचा काय उपयोग त्यामुळे उद्योग आणा पण रिकामे उद्योग आणू नका असे देखील खडे बोल रावल यांनी सुनावले आहे.
चांगले उद्योग यायला पाहिजे, परंतु लोकांच्या जीवावर उदार होतील असे प्रकल्प देखील आमच्या काही कामाचे नाही तसेच धुळे नरडाणा रेल्वे मार्ग झालाच पाहिजे परंतु, तो शेतकऱ्यांच्या जीवावर नाही शेतकऱ्यांना योग्य असा मोबदला मिळाला तरच झाली पाहिजे नाहीतर नाही झाली तरी चालेल. अशा शब्दात माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहणाच्या धोरणावरून सुनावले.