भाजपा आमदार नितेश राणेंचं प्रतिआव्हान; सुप्रिया सुळेंनी तारीख अन् वेळ ठरवावी, मी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 07:59 PM2023-02-05T19:59:56+5:302023-02-05T20:00:28+5:30

जेव्हा धर्मांतर करत नाही तेव्हा तिला मारून टाकण्यापर्यंतची असंख्य उदाहरणे आमच्या महाराष्ट्रात आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलं. 

BJP MLA Nitesh Rane challenged NCP MP Supriya Sule | भाजपा आमदार नितेश राणेंचं प्रतिआव्हान; सुप्रिया सुळेंनी तारीख अन् वेळ ठरवावी, मी...

भाजपा आमदार नितेश राणेंचं प्रतिआव्हान; सुप्रिया सुळेंनी तारीख अन् वेळ ठरवावी, मी...

Next

मुंबई - लव्हजिहाद कायदा व्हावा यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी हिंदु आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुंबईतही अलिकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्क याठिकाणी मोर्चा काढला होता. मात्र लव्ह जिहादची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय जर कुणाला माहिती असेल तर मी चर्चा करायला तयार आहे असं विधान करत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी खुलं आव्हान स्वीकारलं आहे. 

आमदार नितेश राणे म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी जे काही सांगितले मी लव्ह जिहादवर चर्चा करायला तयार आहे. मी हे आव्हान स्वीकारायला तयार आहे. लव्ह जिहाद कशाला म्हणतात. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवलं जाते. त्यांचे आयुष्य खराब केले जाते. याची असंख्य उदाहरणे, संबंधित मुलींना भेटवण्यापासून मी द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच कुणी कुणासोबत लग्न करणे यावर आक्षेप नाही. परंतु लग्नाच्या नावाने प्रेमाच्या नावाने आधी तो अमर होतो त्यानंतर अमीन होतो याला प्रेम प्रकरण म्हणत नाही. लग्नानंतर तुम्ही हिंदू भगिनींना नाव बदलायला सांगता. इस्लाम कुराण वाचायला सांगतात. तिला हिंदू सण साजरे करण्यास बंदी केली जाते. बळजबरीनं धर्मांतर केले जाते. जेव्हा धर्मांतर करत नाही तेव्हा तिला मारून टाकण्यापर्यंतची असंख्य उदाहरणे आमच्या महाराष्ट्रात आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलं. 

दरम्यान, सुप्रियाताईंना त्यांच्या ज्ञानात भर टाकायची असेल तर त्यांनी तारीख, वेळ ठरवावी. लव्ह जिहाद नेमकं कसं होतं? यामुळे हिंदू मुलींचे आयुष्य कसं बर्बाद होते. त्याचे सगळे पुराव्यासकट सांगायला तयार आहे असं आव्हान देत हे ऐकल्यानंतर सुप्रिया सुळेही आमच्यासोबत लव्ह जिहादचं हे आव्हान पेलण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला. 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? 
लव्ह जिहाद हा गंभीर विषय असून मी गेल्या काही दिवसांपासून त्यावर मनमोकळे बोलतेय. राज्यात मोर्चे काढण्याची एक नवी पद्धत निघाली आहे. हे मोर्चे तुम्हाला फक्त सांगतात की काय खायचं, लग्न कुणाशी करायचं. एखाद्या धर्माबद्दलची माहिती त्यातून पोहचली जाते. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही. लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाचीही चर्चा करायला तयार आहे असं आव्हान सुप्रिया सुळेंनी दिले होते. 
 

Web Title: BJP MLA Nitesh Rane challenged NCP MP Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.