"माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 03:21 PM2023-06-25T15:21:08+5:302023-06-25T15:22:15+5:30

भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

 BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray, Aditya Thackeray along with Suraj Chavan and Varun Sardesai | "माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही"

"माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही"

googlenewsNext

मुंबई : काल शिवाजी मंदिरमध्ये एक नाटक होतं. आपलं घर वाचवण्यासाठी एक माणूस पाटण्याला गेलेला. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली नव्हती. पण स्वतःचा मुलगा वय गेल्यानंतर एक बाप काल आम्ही तुमचे व्हॉट्सॲप काढू, घरात घुसू अशा धमक्या देत होते, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच जो स्वतःच्या सख्ख्या भावाचा झाला नाही. जयदेव ठाकरे यांचं न्यायालयातील स्टेटमेंट बघा. त्यांनी स्वतः यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी हडप करण्याचं षडयंत्र कोर्टात सांगितल आहे, असेही राणेंनी सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

"महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार जो कॅगचा रिपोर्ट आला. त्यानुसार आमच्या नेत्यांनी मागणी केली आणि चौकशी सुरू झाली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांची काळजी वाटते मग तुम्ही चंदू मास्तर यांना किती वेळा भेटलात? सूरज चव्हाण सह्याद्रीला बसून मोठ्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन करून बोलवून घ्यायचा. मी अधिकारी वर्गाला आवाहन करेन, विनंती करेन. तुम्ही काम करत असताना जे जे लोक तुमच्यावर दबाव टाकायचे त्यांची नावं घ्या", असे नितेश राणे यांनी सूरज चव्हाण प्रकरणाबद्दल म्हटले.

नितेश राणेंचा इशारा
तसेच माझ्यासाठी सूरज चव्हाण सारखे पगारी नोकर महत्त्वाचे नाहीत. आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, पाटणकर ही नावं बाहेर आली पाहिजेत. माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग आहेत. माझ्या नेत्याबद्दल जास्त फडफड केली तर एकही कपडा अंगावर ठेवणार नाही. फडणवीस साहेब लांबचे आहेत आधी आम्हाला हात लावून दाखवा, अशा शब्दांत राणेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

Web Title:  BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray, Aditya Thackeray along with Suraj Chavan and Varun Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.