आदित्य ठाकरेंना शिवसेनेतूनच होतोय विरोध?; आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:15 AM2022-02-23T11:15:59+5:302022-02-23T11:19:58+5:30

ताईंना धन्यवाद देतो की त्या स्वार्थापोटी का होईना पण आमचा लढा लढतायेत असा चिमटा भाजपा आमदार नितेश राणेंनी किशोरी पेडणेकर यांना लगावला आहे.

BJP MLA Nitesh Rane has criticized Aditya Thackeray, Mayor Kishori Pednekar over Disha Salian case | आदित्य ठाकरेंना शिवसेनेतूनच होतोय विरोध?; आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा

आदित्य ठाकरेंना शिवसेनेतूनच होतोय विरोध?; आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा

Next

मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. संजय राऊत-किरीट सोमय्या यांच्या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेत पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pedanekar) यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. या पत्रात दिशा सालियनची होणारी बदनामी थांबवावी असं म्हटलं होतं. त्यानंतर महापौरांनी सालियन कुटुंबीयांची भेट घेतली.

आता या प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी किशोरी पेडणेकर यांना खोचक टोला लगावला आहे. नितेश राणे म्हणाले की, महापौर किशोरीताई पडणेकर यांना संजय राऊतांनी दिशा सालियनवर चर्चा नको असं पत्रकार परिषदेत ठणकावत होते. पण ताई थांबल्या नाहीत. त्यांनी महिला आयोगाला पत्रही लिहले आणि सालियन परिवाराची मिडीयासोबत भेटही दिली. इतकेच नाही तर मागे त्यांनी त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात असं स्वतःच जाहीर केले. त्यांचा हा उत्साह कदाचित आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) जेव्हापासून ४५ वर्षावरील नगरसेवकांचे तिकीट कापले जाईल असा छुपा संदेश दिला आहे त्यामुळेच असेल असं म्हटलं आहे.

तसेच मुळात या प्रकरणाचं राजकारण शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळं होतं आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरेंची चाललेली घौडदौड थांबविण्याठी किणी प्रकरणाची रसद आतल्या गोटातूनच मिडियाला देण्यात आली होती. तसेच काही आदित्यच्या युवासेनेला लगाम घालण्यासाठी घडत आहे असा दावा करत नितेश राणे यांनी मी ताईंना धन्यवाद देतो की त्या स्वार्थापोटी का होईना पण आमचा लढा लढतायेत असा चिमटा काढला आहे.

महिला आयोगानं अहवाल देण्याची पोलिसांनी केली सूचना

"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दिशा सालियनवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे, पेडणेकर यांनी सोमवारी ही तक्रार दाखल केली असून ती मालवणी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली आहे, ज्यांच्या हद्दीत ही घटना घडली होती. चाकणकर पुढे म्हणाल्या, "आम्ही त्यांना तिचा शवविच्छेदन अहवाल, एफआयआरची प्रत आणि प्रकरणाशी संबंधित इतर कागदपत्रांसह दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

Web Title: BJP MLA Nitesh Rane has criticized Aditya Thackeray, Mayor Kishori Pednekar over Disha Salian case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.