मुलाची दिवाळी आर्थर जेलमध्ये जाणार असल्याने उद्धव ठाकरे संतापलेत; भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:07 PM2023-08-07T12:07:59+5:302023-08-07T12:08:42+5:30
स्वत:ची सुंता करून राजकीय धर्मांतर ज्यांनी केले त्यांना औरंग्याची तुलना करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल भाजपाने उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. मुलाची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये जाणार असल्याने बाप म्हणून उद्धव ठाकरे संतापलेत. हा राग ते भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायेत असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी करत ठाकरे-संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे जो स्वत:च्या वडिलांचा, स्वत:च्या धर्माचा, स्वत:च्या सख्ख्या भावाचा झाला नाही ते देवेंद्र फडणवीस यांना नाव ठेवत असेल तर नमकहराम कुणी नाही. देवेंद्र फडणवीसांनी सत्ता काळात भावाप्रमाणे त्यांना सांभाळले. उद्धव ठाकरेंचे मूळ दुखणं भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस नाही तर आता ज्या कारवाया होतायेत त्या रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर यांच्यावर होतायेत. बाप म्हणून उद्धव ठाकरेंना कळालं आहे, माझा मुलगा जेलमध्ये जाणार आहे. माझ्या मुलाची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये होणार आहे त्याचा राग कुणावर काढायचा तर तो भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायेत. कोविड काळात भ्रष्टाचार करायला आम्ही सांगितला होता का? मुलगा जेलमध्ये जाणार ते सहन होत नसल्याने ही कारवाई थांबवू शकत नाही याचा राग उद्धव ठाकरे भाजपा-देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायेत असं त्यांनी सांगितले.
तसेच स्वत:ची सुंता करून राजकीय धर्मांतर ज्यांनी केले त्यांना औरंग्याची तुलना करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे का? सापांना कसं माहिती संजय राऊत, उद्धव ठाकरेंच्या घरी जायचे. महाराष्ट्रात वळवळणारा साप म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. औरंग्याच्या विचारसरणीचे राज्यात कोण तर उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी आहे. उद्धव ठाकरे हे मस्टर लिहिण्याच्या लायकीचे राहिले आहेत का?, टीका करून तुम्ही बौद्धिक पात्रता महाराष्ट्राला दाखवतायेत. लहान मुले आहेत का फोडायला. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना माहिती नाही का त्यांचे भविष्य काय आहे. आम्ही कुणाच्या दारावर गेलो नाही. त्यांना मोदींच्या नेतृत्वात भविष्य दिसते असंही आमदार नितेश राणे म्हणाले.
त्याशिवाय मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या नावासमोर हिंदुह्दयसम्राट लिहायची लाज वाटत होती. तुमच्यात हिंमत असेल तर आगामी इंडिया बैठकीचे संयोजक तुम्ही आहात. राहुल गांधींना तुम्ही शिवतीर्थावर आणा आणि बाळासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक व्हायला सांगा. ज्यादिवशी ती हिंमत दाखवतील तेव्हा त्यादिवशी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मानायला तयार आहे असं आव्हानही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
लवकरच ती नावे पुढे आणणार
हयातचे जेवण, हयातचे बुकींग ज्यांच्या नावाने होतेय त्यांची नावे समोर आणेन, कोविड काळात ज्यांना कंत्राटे दिली त्यांची नावे आहेत. हयातच्या बुकींगसाठी पुढे येणारी नावे लवकरच मी पुढे आणेन. नितीन देसाईंच्या मृत्यूवर घाणेरडे राजकारण करण्याचे काम राऊत-ठाकरे टोळी करत असेल तर मराठी माणूस माफ करणार नाही. माणूस गेल्यानंतर तुम्ही राजकारण करतायेत. बेछूट आरोप करायचे असतील तर सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन, मनसुख हिरेनसारखी सगळी प्रकरणे बाहेर येतील असा इशारा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना दिला.
नाना पटोलेंना टोला
ओसाड गावचे पाटील मुख्यमंत्री कसे बनू शकतात? पहिले काँग्रेसची सत्ता येऊ दे, ५० आमदार तरी निवडून येऊ द्या. जे आहेत ते आमदार टिकवा तरी. २०२४ किंवा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत काँग्रेसचे किती आमदार त्यांच्यासोबत पक्षात राहतात याबाबत नाना पटोलेंनी उत्तर द्यावे. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर भाष्य करावे अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानावर टोला लगावला आहे.