...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:08 PM2022-07-26T17:08:53+5:302022-07-26T17:09:21+5:30

मुंबईवर जितके आमचे प्रेम तितके कुणाचं नाही. मुंबईला लुटण्याचं काम पिता-पुत्र करत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला.

BJP MLA Nitesh Rane target Uddhav Thackeray, Aaditya Thackeray | ...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

Next

मुंबई - उद्धव ठाकरेंची मुलाखत ऐकून मनात दु:ख झाले. माझे वडील आहेत. माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. उद्धव ठाकरेंना अजून कळलं नाही. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र असंख्य लोकांचे दैवत आहेत आणि आपल्याच वडिलांना अजून किती लहान करणार हे न कळल्यामुळे उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले आहेत असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

नितेश राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानतो जर त्यांच्या कुटुंबाने सांगितले महाराजांचे फोटो लावू नका, आंबेडकरांचे फोटो लावू नका. मग त्या त्या महापुरुषाला तुम्ही लहान करत नाही का? हे उद्धव ठाकरेंना कळालं नाही. बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही. स्मारक का बांधताय? ज्योत का पेटवली आहे? राज्यातील जनता तिथे नतमस्तक होते. शिवसेनाप्रमुखांना किती लहान करणार आहात? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच तुम्ही गुंगीत होता, उभं राहता येत नव्हतं मग डावोसमध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई काय ढिंगाणा घालत होता ते विचारा. तुमच्या मुलाला प्रश्न विचारू शकत नाही मग अन्य लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? राज्यातील आमदारांना पालापाचोळा बोलून महाराष्ट्राचा अपमान करत आहात. ते लोकप्रतिनिधी आहेत. लोकांमधून निवडून आले आहेत. राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्र आमच्या बापाची जहागिर आहे अशा आवेशात अडीच वर्ष कारभार केला असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, मुंबईवर जितके आमचे प्रेम तितके कुणाचं नाही. मुंबईला लुटण्याचं काम पिता-पुत्र करत आहेत. मुंबईशी गद्दारी कोणी केली? साडेसातनंतर दिनू मोरियाच्या घरी उद्धव ठाकरेंचे पुत्र कोरोना काळात ढिंगाणा घालायचे तेव्हा तुम्हाला मुंबई आठवली नाही का? महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी कार्डवर पाटणकर नाव चढवायचं आहे. हे पण माझं, ते पण माझं हेच अडीच वर्षात अजून काय केले? मुंबई कुणी तोडणार नाही. मुंबईला विकणारे हे लोक आहेत असा घणाघात नितेश राणेंनी केला. 

वरूण सरदेसाई, संजय राऊतांची सुरक्षा काढा
वरुण सरदेसाईमुळे युवासेनेची वाट लागली. हे संपवण्याचं काम वरूण सरदेसाईने केले. युवासेना विकायला काढायची. मुंबई महापालिका, मुख्यमंत्री कार्यालयाच्या बैठकीत वरूण सरदेसाईंना का बसवलं गेले? सरकारी सुरक्षा का पुरवली जातेय? वरूण सरदेसाई, संजय राऊतांची सुरक्षा सरकारने काढावी अशी मागणी नितेश राणेंनी केली. 
 

Web Title: BJP MLA Nitesh Rane target Uddhav Thackeray, Aaditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.