“आदित्य ठाकरेजी, मणिपूरचे सोडा; आपल्या पक्षात काय सुरू आहे ते आधी पाहा”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 08:32 PM2023-07-20T20:32:46+5:302023-07-20T20:37:08+5:30

Manipur Violence: मणिपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. आदित्य ठाकरेंनी आपले आमदार किती राहिलेले आहेत त्याकडे लक्ष द्यावे, अशी टीका करण्यात आली आहे.

bjp mla shweta mahale slams shiv sena thackeray group leader aaditya thackeray | “आदित्य ठाकरेजी, मणिपूरचे सोडा; आपल्या पक्षात काय सुरू आहे ते आधी पाहा”; भाजपची टीका

“आदित्य ठाकरेजी, मणिपूरचे सोडा; आपल्या पक्षात काय सुरू आहे ते आधी पाहा”; भाजपची टीका

googlenewsNext

Manipur Violence: मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवले. संबंधित महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. 

राज्यात इर्शाळगड येथे जी दुर्घटना घडली, ती अत्यंत दुर्देवी आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. बचाव कार्य, मदत कार्य जोमाने सुरू आहे. जेवढे होईल तेवढे शासन आपल्या परीने प्रयत्न करेल. लोकांना वाचवण्याच्या आणि अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दखल सगळ्यांनी घ्यायला हवी असे मला वाटते, असे भाजप आमदार श्वेता महाले यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरेंवर टीका केली. 

मणिपूरचे सोडा, आदित्य ठाकरेंनी आपल्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावे

मीडियाशी बोलताना श्वेता महाले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षात काय सुरू आहे हे आधी पाहावे. मणिपूरमध्ये काय सुरू आहे? यावर बोलण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांनी आपले आमदार किती राहिलेले आहेत त्याकडे लक्ष द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. तिथली सगळी परिस्थिती जाणून घेत आहेत, असे महाले म्हणाल्या. 

दरम्यान, मणिपूरमधून जे व्हिडिओ समोर आलेत, ते अत्यंत धक्कादायक आहेत. ही किळसवाणी कृती आहे. कोणत्याही महिलांबरोबर असे घडू नये. या घटनेचा निषेध करते. महिला म्हणून अशा जर घटना घडत असतील, तर महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पुन्हा घडू नये, यासाठी प्रयत्न होणे तितकेच गरजेचे आहे, असेही श्वेता महाले यांनी सांगितले.


 

Web Title: bjp mla shweta mahale slams shiv sena thackeray group leader aaditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.