राज्यातील भाजपाच्या एका आमदाराला कोरोनाची लागण; कुटुंबातील इतर ६ जणांना झाली बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:03 PM2020-08-10T16:03:19+5:302020-08-10T16:08:17+5:30
राज्यात रविवारी १३ हजार ३४८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांसमोर संकट उभं राहिलं आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होण्यासाठी लॉकडाऊन करणे, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं हे उपाय सरकारकडून करण्यात येत आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याची चिंता सरकारला पडली आहे.
अशातच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यात आता भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबत आमदाराच्या घरातील ६ जणांनाही कोरोनाबाधा झाल्याची माहिती आहे. याबाबत आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे की, ४ ऑगस्ट रोजी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अन्टीजन टेस्ट केली. परिवारातील ६ सदस्य कोरोना बाधित आले. शनिवारी परत सदस्य व संपर्कातील सर्वांचे RT PCR केले. माझ्यासह परिवारातील ३ तर संपर्कातील ३ बाधित तर ३ अहवाल प्रतिक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची प्रकृती चांगली आहे. काळजी घेतो आहे. आपणही घ्या असं त्यांनी सांगितले आहे.
मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. अनेकांचे काॅल येतात. पण सर्व काॅल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास SMS द्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. लवकर बरे होऊत. लवकरच जनसेवेत असेन https://t.co/1xgKaz0gis
— Sujitsingh Thakur (@sujit_thakurmlc) August 9, 2020
तसेच मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. अनेकांचे कॉल येतात. पण सर्व कॉल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास SMS द्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. लवकर बरे होऊत. लवकरच जनसेवेत असेन असा विश्वास आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. तर व आमदार सुजितसिंह यांच्या परिवारातील सर्व जण कोरोनावर मात करून नक्की परत येतील ही खात्री आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य @sujit_thakurmlc आणि त्यांच्या परिवारातील सहाजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे समजले. ते व त्यांच्या परिवारातील सर्व जण कोरोनावर मात करून नक्की परत येतील ही खात्री आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 10, 2020
दरम्यान, राज्यात रविवारी १३ हजार ३४८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. पण रविवारी एकाच दिवसात १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी
महाविकास आघाडीत एकमत नाही; ‘या’ महिन्यापर्यंत सरकार कोसळेल; नारायण राणेंचा पुनरुच्चार
देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीला धक्का; राणेंच्या उपस्थितीत शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात दाखल