'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:54 PM2024-06-16T12:54:03+5:302024-06-16T12:54:48+5:30

"जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले

BJP MLA T. Raja Singh Lodh claim BJP 400+ seats in Lok Sabha Election 2024 India Hindu Nation | '४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

T. Raja Singh, India as Hindu Nation: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. दोन महिन्यांच्या धामधुमीनंतर ४ जूनला निकाल लागले. त्यात भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. पण भाजपाने NDA तील मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापना केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतात सरकार स्थापन झाले. पण असे असले तरी भाजपाच्या नेतेमंडळींकडून आजही विधाने करताना दिसतात. तशातच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी एक मोठा दावा केला आहे.

भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी भिवंडी येथे आयोजित केलेल्या धर्मसभेला हजेरी लावली. या धर्मसभेत वेगवेगळे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी जाहीर भाषणात बोलताना टी राजा सिंह यांनी 'हिंदूराष्ट्रा'बाबत एक विधान केले. "लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागा जिंकल्या असत्या तर आपला भारत देश नक्कीच हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," असा दावा टी राजा सिंह यांनी केला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, "मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही. वक्फ बोर्ड रद्द करावा. महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावी."

"महाराष्ट्रातील हिंदुत्त्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचे भय आहे? त्यांच्या मागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे. मलंगगडला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जाते. हा मलंगगड मुक्त झाला पाहिजे. जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले.

Web Title: BJP MLA T. Raja Singh Lodh claim BJP 400+ seats in Lok Sabha Election 2024 India Hindu Nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.