एकतर्फी प्रेमातून भाजपा आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

By admin | Published: April 3, 2017 10:08 AM2017-04-03T10:08:46+5:302017-04-03T12:09:37+5:30

पिंपरी चिंचवड येथे भाजपा आमदाराच्या मुलीवर एक विद्यार्थाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

BJP MLA's daughter had a deadly attack on love | एकतर्फी प्रेमातून भाजपा आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

एकतर्फी प्रेमातून भाजपा आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - पिंपरी चिंचवड येथे भाजपा आमदाराच्या मुलीवर एक विद्यार्थाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ला झालेली तरुणी यवतामाळ जिल्ह्यातील वणीचे भाजपा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मुलगी आहे. अश्विनी असे पीडित मुलीचे नाव आहे. हल्ल्यात अश्विनीच्या हाताची बोटं कापली गेलीत. सुदैवानं ती हातापासून वेगळी झालेली नाहीत. तिला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्निनी आणि प्राणघातक हल्ला करणारा विद्यार्थी हे येथील बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. राजेश बक्षी असे हल्ला करण्याऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा हरियाणाचा आहे. 

पोलीसांनी आरोपी विद्यार्थाला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सत्तूर या धारदार शस्त्राने बक्षीने हा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यर्थिनी गंभीर जखमी झाली आहे. वाकडच्या बालाजी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून संशयित आरोपी बक्षीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Web Title: BJP MLA's daughter had a deadly attack on love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.