"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, जयंत पाटील राज्यातला बिनडोक नेता"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 04:55 PM2022-11-17T16:55:33+5:302022-11-17T16:56:14+5:30
देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने फडणवीसांच्या मागे ठाम राहण्याची भूमिका घेतली असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जे विश्वासघातानं आलं होतं. ते सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या हिंदुत्वावर शिवसेना उभी होती ती शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेलेली आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक निर्णय झाले. अनेक वर्षापासून अफजल खानाच्या कबरीशेजारील अतिक्रमण काढण्याचं धाडस उद्धव ठाकरेंमध्ये नव्हते. परंतु आमचं सरकार आल्यानंतर ते अतिक्रमण काढून टाकलं. राज्यात हिंदुत्ववादी वातावरण तयार व्हायला लागलं त्यामुळे भीती वाटायला लागली आहे असा घणाघात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या वधाचा देखावा उभारण्याचा चांगला निर्णय पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला. मागील काळात नुसतं अफजल खान वधाचा फोटो लावला तरी दंगली व्हायच्या. परंतु या सरकारमध्ये धमक आहे. हिंदुत्वाच्या बाबतीत कुणीही आम्हाला सांगण्याची गरज नाही. संभाजीनगर, धाराशिव नामांतरण अडीच वर्ष सरकारमध्ये असताना करता आले नाही. परंतु राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचं पत्र दिल्यानंतर शेवटच्या बेकायदेशीर कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हे मतांसाठी करतायेत हे लोकांसमोर आलं असं पडळकरांनी सांगितले.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेला हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. ज्या मुंबईच्या स्फोटात शेकडो मुंबईकर मारले गेले. त्यांच्यासोबत जमीन व्यवहार करणाऱ्यांसोबत मांडीला मांडी लावून बसता. इकडे आड तिकडे विहिर अशी उद्धव ठाकरेंची परिस्थिती आहे. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे वीर सावरकरांबद्दल विधान केले. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल त्यांच्या आजीने जे पत्र लिहिलं होते ते वाचावं. उद्धव ठाकरेंनी या विषयात बोललं पाहिजे. त्यावर भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान गोपीचंद पडळकरांनी केले.
त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने फडणवीसांच्या मागे ठाम राहण्याची भूमिका घेतली. २०१९ मध्ये १०५ आमदार निवडून गेले. भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्यामागे ठाम आहे. तुमचं घर वाहून गेले ते घर उभं करण्याचा प्रयत्न करा. भाजपावर बोलून त्याचा काही उपयोग होणार नाही असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.
जयंत पाटील राज्यातला बिनडोक नेता
जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता आहे. माझ्या भावाला तुम्ही हद्दपारीची नोटीस दिली होती. आमच्यावर अनेक गुन्हे नोंद केले. त्यावेळी तुम्ही काय केले? या राज्यातला प्रत्येक नेता गर्दीत असतो. जितेंद्र आव्हाडांनी ज्यारितीने महिलेला बाजूला केले असा एकतरी व्हिडिओ दाखवा आम्ही माफी मागतो. जयंत पाटलांच्या विधानाला काडीचीही किंमत नाही. विरोधकांवर चुकीच्या पद्धतीने काम करण्याची आम्हाला गरज नाही असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"