भाजपा-मनसे कार्यकर्ते भिडले
By admin | Published: March 14, 2016 02:50 AM2016-03-14T02:50:09+5:302016-03-14T02:50:09+5:30
जनता दरबारसाठी कार्यालयाच्या दिशेने निघालेले भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर मनसैनिकांनी रविवारी हल्ला चढविला. भाजपा-मनसे आपआपसांत भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण
मुंबई : जनता दरबारसाठी कार्यालयाच्या दिशेने निघालेले भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर मनसैनिकांनी रविवारी हल्ला चढविला. भाजपा - मनसे आपआपसांत भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळेस पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. तब्बल दोन तासांनंतर परिस्थितीवर नियंत्रण आणत मनसे कार्यकर्त्यांना कुरार पोलिसांनी ताब्यात घेतले.
‘उत्तर भारतीयांचे मुंबईत तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केले, तर त्याच्यापेक्षा दुप्पट तुमचे नुकसान करू,’ असे खुलेआम पत्र लिहून कम्बोज यांनी राज ठाकरेंना शनिवारी धमकी दिली होती. याच्या निषेधार्थ रविवारी दुपारच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी मोहित कम्बोज यांच्या कुरार येथील कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यात भाजपाचे कार्यकर्ते जखमी झाले. (प्रतिनिधी)घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एम. रामकुमार यांच्यासह कुरार, दिंडोशी आणि मालाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यास दुपारी २च्या सुमारास पोलिसांना यश आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त एम. रामकुमार यांनी दिली....म्हणून मनसे कार्यकर्ते भडकले
राज ठाकरे यांच्याविरुद्ध
पत्र लिहिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढविला. मी जनता दरबारसाठी जात असताना मनसेच्या अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला.
त्यांच्या तावडीतून आम्ही निघालो. नंतर आमच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. यापैकी १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते, असे भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी ‘लोकमत’ला सांगितले.