Mohit Kamboj On Sanjay Raut : संजय राऊत माझे पैसे परत करा!; मोहित कंबोज यांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:30 PM2022-02-17T14:30:50+5:302022-02-17T14:31:19+5:30
संजय राऊत यांनी सेनाभवनातील पत्रकार परिषदेत वापरलेल्या शब्दांचं आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे समर्थन करतात का?, कंबोज यांचा सवाल
Mohit Kamboj On Sanjay Raut : "राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ," अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी अखेरिस भाजपच्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या नावाचाही उल्लेख करत ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फ्रन्टमॅन असल्याचंही म्हटलं. तसंच आपण त्यांना ओळखत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर मोहित कंबोज यांनी राऊत यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्याकडून २५ लाख रूपयांची मदत घेतल्याचा दावा त्यांनी केला.
आता पुन्हा एकदा मोहित कंबोज यांनी ट्वीट करत "संजय राऊत पैसे परत करा," अशी मागणी केली आहे. "माझा आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना एक विनम्रतेने प्रश्न आहे. संजय राऊत यांनी सेनाभवनात एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे शब्द वापरले, आदित्य ठाकरे आज जे तरुण पिढीची गोष्ट करतात, सुप्रिया सुळे ज्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेबाबत बोलतात या शब्दांचं ते समर्थन करतात की नाही?," असा सवाल कंबोज यांनी केला.
#SanjayRaut मेरा पैसा वापस कर ! @rautsanjay61
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 17, 2022
ठाकरे शैली, ठाकरे भाषा ये सिर्फ और सिर्फ स्वर्गीय हिंदुहद्यसम्राट बालासाहब जी को ही शोभा देती थी ।
तमाम हिंदु भाई और बहनो के लिये शिवसेना भवन एक मंदीर की तरह है वहा पर ये इस तरह की भाषा क्या राऊत की जुबा पर शोभा देती है क्या ? @AUThackeray जी - @supriya_sule जी pic.twitter.com/I6Lm8nWsPG— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 17, 2022
"दुतोंडी राजकारण आता नाही चालणार. जर तुम्ही याचं समर्थन करत असाल तर समर्थनाबाबत सांगा अन्यथा समर्थन करत नसाल तर त्याबाबत सांगा. सेनाभवनात बसून जर आज राऊत स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांच्या तुलना करू पाहत असतील राऊतांनी हे समजावं की तुम्ही त्यांच्या पायाची धुळही नाही. बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट आणि प्रत्येकाच्या हृदयात त्यांचा मान आहे. तुम्ही त्यांना कॉपी करण्याचा विचार करू नका. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात अमर आहेत. आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी ते राऊत यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का हे स्पष्ट करावं," असंही ते म्हणाले.
यापूर्वी काय म्हणाले होते कंबोज?
यापूर्वी राऊत यांच्या वक्तव्यावर कंबोज यांनी प्रत्युत्तरही दिलं होतं. "संजय राऊत हे मला ओळखत नाहीत असं म्हणतात. तरीही दरवर्षी गणेशोत्सवात माझ्या घरी येतात. अनेकदा मी गरज भासल्यास त्यांना पैसेही दिले आहेत," असे मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. तसेच, संजय राऊत यांचा स्वत:च्या घरात सत्कार करतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला होता.
अनजान आदमी से 25 लाख की मदद ली संजय राउट ने !
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 15, 2022
Royal Marathe Entertainment के नाम से पैसे लिए 2014 में !
पूरा बेइज्जत करूँ गा तेरे को संजय राउट , तेरी असलियत सब को मैं बताता हूँ ! pic.twitter.com/oJb9BusUQo
अनोळखी माणसाकडून संजय राऊत यांनी २५ लाख रुपये मदत घेतली. २०१४ मध्ये रॉयल मराठा एंटरटेनमेंट कंपनीच्या नावाने हे पैसे घेतले आहेत. आता, तुमचं सत्य सगळ्यांना सांगणार, पूर्णपणे बेईज्जत करणार संजय राऊत तुम्हाला... अशा शब्दात मोहित कंबोज यांनी ट्वीट करुन राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.