Maharashtra Politics: “भास्कर जाधव विश्वासघातकी, खोटारडे; अजिबात गुवाहाटीला बोलावू नका, मी साक्षीदार...”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 05:14 PM2023-02-28T17:14:39+5:302023-02-28T17:16:35+5:30
Maharashtra News: भास्कर जाधव सत्यापासून दूर पळू शकत नाही, असे सांगत भाजपने पलटवार केला आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचा पवित्रा घेतला, तेव्हा भास्कर जाधवांनी १०० हून अधिक वेळा शिंदे यांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी कॉल केला होता. परंतु आमदारांच्या विरोधामुळे भास्कर जाधव यांना शिंदे गटात घेतले नाही, असा दावा भाजपकडून करण्यात आला. यानंतर भास्कर जाधव यांनी दावा खोडून काढत भाजपवर टीका केली. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भास्कर जाधव विश्वासघातकी, खोटारडे; अजिबात गुवाहाटीला बोलावू नका, असे गुवाहाटीला असलेल्या आमदारांचे म्हणणे होते. याचा मी साक्षीदार आहे, असा पलटवार भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
मी तत्वासाठी लढतो. जर मोहित कंबोज १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. देवेंद्र फडणवीस आता सुरुवातच झाली असेल तुमच्याकडे सत्ता, पैसा, तपास यंत्रणा आहेत. मी तत्त्वासाठी, ध्येयासाठी लढतो. मी सामान्य माणूस आहे त्यामुळे अशी यंत्रणा लावा जर मी एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी लावले असले तरी मी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईन. त्याचसोबत मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे. अनाजीपंतांना सांगतो. तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार संपवायला निघाला परंतु माझ्यासारखे भास्कर जाधव १०० उभे राहतील. तुम्ही १ आरोप सहन करू शकत नाही. मी सामान्य माणूस आहे. मी कुणाच्या दरवाजात राजकारणासाठी उभे राहिलो नाही. मोहित कंबोज, अनाजीपंत यांनी एक आरोप सिद्ध करून दाखवावे, असे प्रतिआव्हान भास्कर जाधव यांनी दिले आहे. यावर मोहित कंबोज यांनी पलटवार केला.
भास्कर जाधव विश्वासघातकी, खोटारडे; अजिबात गुवाहाटीला बोलावू नका
मोहित कंबोज यांनी ट्विट केले असून, भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधव गुवाहाटीला निघाले पण एकनाथ शिंदेजींनी त्यांना सांगितले की आम्ही तुम्हाला घेऊन जाणार नाही आणि इथे येणार नाही, मी स्वतः तिथे होतो आणि या घटना माझ्या समोर आहेत! जाधव हा लबाड-फसवणूक करणारा तसेच विश्वासघातकी माणूस आहे, यावर गुवाहाटीतील सर्वांचा विश्वास होता! यावर जाधव यांना आता काय म्हणायचे आहे?, असा सवाल कंबोज यांनी ट्विटरवरून केला. भास्कर जाधव जिभेवर ताबा नाही पण लावला पाहिजे, हा व्हिडीओ 2024 साठी सेव्ह करा, महाराष्ट्र बघेल! असा इशाराही मोहित कंबोज यांनी दिला.
दरम्यान, भास्कर जाधवांचा रोष सांगतोय की, दुखरी नस दाबली गेली आहे. मात्र, भास्कर जाधव सत्यापासून दूर पळू शकत नाही. हिंमत असेल तर माझे विधान खोटे आहे म्हणून सांगा. जो आयुष्यात एका पक्षाचा नव्हता, तो कोणाचा असेल का, तुमच्यासारखे पक्ष बदलणारे रस्त्यावर विकले जातात, अशी घणाघाती टीकाही मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"