हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:34 PM2024-10-04T17:34:27+5:302024-10-04T17:36:01+5:30

BJP MP Ashok Chavan News: अजित पवारांचे निकटवर्तीय तिथे आमदार आहेत. तिकडे भाजपला जागा मिळणे कठीण आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

bjp mp ashok chavan reaction over harshvardhan patil decision to join ncp sharad pawar group | हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

BJP MP Ashok Chavan News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असे बोलले जात आहे. यातच महायुतीला एकामागून एक धक्के बसत आहेत. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

गेली ६ दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. परंतु आता निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो, ती जनतेची भूमिका असते. त्यामुळे आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात समर्थकांचा जाहीर मेळावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले. यावर काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करत खासदार झालेल्या अशोक चव्हाण यांनी भाष्य केले.

म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असावा

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावर अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, इंदापूरची राजकीय परिस्थिती जी आहे, त्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेतला असेल. तो मतदार संघ अजित पवार यांचे निकटवर्तीय सध्या तिथे आमदार आहेत. त्यामुळे, स्वाभाविक आहे, तिकडे भाजपला जागा मिळणे कठीण आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असावा, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मंत्रालयातील जाळीत उडी मारल्याबाबत अशोक चव्हाण म्हणाले की, घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने थोडा संयम पाळायला पाहिजे. त्यांनी जर एखादी गोष्ट सांगितली की, ते कोणी ऐकणार नाही, असे कधी होत नसते. त्यांना काहीतरी गैरसमज झाला असेल असे मला वाटते. जे घडले ते योग्य नाही.

 

Web Title: bjp mp ashok chavan reaction over harshvardhan patil decision to join ncp sharad pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.