“नाथाभाऊंनी लोकसभेला पाठिंबा दिला, माझ्यासाठी काम केले, ते भाजपात...”: रक्षा खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 10:56 PM2024-09-01T22:56:08+5:302024-09-01T22:57:46+5:30

BJP MP Raksha Khadse News: जिथे भाजपाचे आमदार आहेत, त्या जागा भाजपकडून लढवल्या जातील, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.

bjp mp raksha khadse told eknath khadse supported in lok sabha election and worked for me | “नाथाभाऊंनी लोकसभेला पाठिंबा दिला, माझ्यासाठी काम केले, ते भाजपात...”: रक्षा खडसे

“नाथाभाऊंनी लोकसभेला पाठिंबा दिला, माझ्यासाठी काम केले, ते भाजपात...”: रक्षा खडसे

BJP MP Raksha Khadse News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच अनेक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच महायुतीत अंतर्गत कलह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत की भाजपामध्ये आहेत, एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाला का वेळ लागत आहे, असे मुद्दे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत. यावर भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. 

पत्रकारांशी बोलताना रक्षा खडसे यांनी सांगितले की, थोड्याफार फार प्रमाणात मतभेद असतात. घरात चार लोक राहतात. मतभेद होतात. भाजपा हा मोठा पक्ष आहे, मतभेद होऊ शकतात. थोड्याफार अडचणी सगळीकडे असतात. आमदारांवर नाराज आहे असे काही नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत असतो. छोट्या मोठ्या विषयांवर चर्चा झाली. सूचना देण्याचे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. उमेदवारी मागणी गुन्हा नाही पक्ष ठरवते कोणाला उमेदवारी द्यायचे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचे, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.

जिथे भाजपाचे आमदार, त्या जागा भाजपा लढवणार

जिथे भाजपाचे आमदार आहेत, त्या जागा भाजपकडून लढवल्या जातील. महायुती म्हणूनच येणारी निवडणूक लढवू. प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. वरिष्ठांनी आदेश दिला आहे की, महायुती म्हणून तीन पक्ष सोबत मिळून निवडणूक लढायची आहे. शिंदे गटाचे, अजितदादा गटाचे कार्यकर्ते सोबत आहेत. सर्व मिळून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक शहरातील तीन विधानसभांची जबाबदारी दिली आहे. जे आम्ही लोकसभेला अनुभवले ते काही होऊ नये, याची दक्षता आमच्याकडून घेतली जात आहे, असे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, नाथाभाऊंनी लोकसभेला मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी काम केले. भाजपामध्ये येण्याची इच्छा ही व्यक्त केली. तो नाथाभाऊंचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनाच याबाबत विचारणे अधिक चांगले, असे रक्षा खडसे यांनी सांगितले. 
 

Web Title: bjp mp raksha khadse told eknath khadse supported in lok sabha election and worked for me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.