...म्हणून शरद पवारांनी माघार घेतली, मी सर्वांना पुरून उरणारा; खा.रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:00 PM2022-03-27T17:00:03+5:302022-03-27T17:06:35+5:30

खा रणजितसिंह यांच्या मागणीनुसार फलटणला तातडीने पासपोर्ट कार्यालय सुरू करणार, केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचं आश्वासन

BJP MP Ranjit Singh Naik Nimbalkar criticizes NCP President Sharad Pawar | ...म्हणून शरद पवारांनी माघार घेतली, मी सर्वांना पुरून उरणारा; खा.रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा टोला

...म्हणून शरद पवारांनी माघार घेतली, मी सर्वांना पुरून उरणारा; खा.रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा टोला

googlenewsNext

फलटण- सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार मला व आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून तोही या सर्वांना पुरून उरणारा आहे असा इशारा भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. शायनिंग महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनीही हजेरी लावली होती.    

माढा लोकसभा मतदारसंघाचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. याची दखल घेत तातडीने फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय दूर संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा समावेश असणाऱ्या शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप आणि भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशांमधील आदर्श खासदारांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या विविध योजना ह्या सर्वसामान्य नागरिकांना कळाव्यात व त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा, यासाठी शाइनिंग महाराष्ट्र हे महा प्रदर्शन त्यांनी आयोजित करून चांगला पायंडा पाडला आहे.  या  महाप्रदर्शनामुळे केंद्रीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळलेली आहे व आगामी काळामध्ये सुद्धा अशाच विविध योजनांच्या द्वारे केंद्र सरकारची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवण्यात येईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री ना. देवूसिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो.जनतेला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही आगामी काळामध्ये मुंबईवरून हैदराबादकडे जाणारी बुलेट ट्रेन फलटण व अकलुज मार्गे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच माढा लोकसभा मतदार संघ विकासात आघाडीवर असेल असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केले. प्रास्ताविक जयकुमार शिंदे यांनी केले तर आभार अनुप शहा यांनी मानले.

...म्हणून शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा शरद पवार व विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तर खा शरद पवार पूर्वी निवडून गेले होते. परंतु भाजपच्या उमेदवारापुढे आपला टिकाव लागणार नाही हे कळल्यानंतर त्यांनी ही माघार घेतली होती. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझ्या विरोधात खेळलेल्या षडयंत्रामध्ये कधीही हारलो नाही त्यामुळे कोणत्याही आंडुपांडूच्यासमोर सुद्धा आपण हरणार नाही असा इशारा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  केले. 

या कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, मी भेटल्यावर जिहे कठापुर योजनेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 700 कोटी निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे. सातशे कोटी निधी म्हणजे नक्की सातशे वर किती शून्य हे रामराजेंना विचारा असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला

 

Web Title: BJP MP Ranjit Singh Naik Nimbalkar criticizes NCP President Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.