सांगली जिल्ह्यात भाजपाची मुसंडी
By Admin | Published: February 24, 2017 04:36 AM2017-02-24T04:36:46+5:302017-02-24T04:36:46+5:30
जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर खातेही न उघडलेल्या भाजपाने यंदा जोरदार मुसंडी मारत थेट
सांगली : जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर खातेही न उघडलेल्या भाजपाने यंदा जोरदार मुसंडी मारत थेट सत्तेपर्यंत मजल मारली. ६० पैकी २५ जागा मिळवून भाजपा जिल्हा परिषदेतील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसला निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला.
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी समविचारी रयत विकास आघाडी आणि शिवसेनेला सोबत घेऊन ते सत्ता स्थापन करू शकतात. राजकीय तज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवत भाजपाने मोठे यश मिळविले.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये केलेल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे जागांचे गणित फिस्कटले, तर पक्षांतर्गत गटबाजी आणि फाजिल आत्मविश्वासाचा फटका काँग्रेसला बसला. काँग्र्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम
यांना पलूस-कडेगाव या स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात, तर भाजपाचे खा. संजयकाका पाटील यांना स्वत:च्या तासगाव तालुक्यात
जबर दणका बसला. बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यातही काँग्रेसची वाताहत झाली आहे. वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले, मात्र त्यांचे सत्तेचे स्वप्न भंगले. आजवर एकदाच एकच जागा जिंकलेल्या शिवसेनेला यंदा आ. अनिल बाबर यांच्या माध्यमातून तीन जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेनेचे बळ वाढले आहे.
सांगली
पक्षजागा
भाजपा२५
राष्ट्रवादी१४
काँग्रेस१०
शिवसेना०३
इतर०८