Maharashtra Political Crisis: “तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 10:11 AM2022-08-04T10:11:28+5:302022-08-04T10:12:47+5:30

Maharashtra Political Crisis: शिवसेनेत उरलेल्या आमदार, खासदारांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावे, असे आव्हान देत आदित्य ठाकरेंच्या सभांची गर्दी कॅमेऱ्याची कमाल असल्याचा दावा करण्यात आला आहे.

bjp mp sujay vikhe patil taunt shiv sena aaditya thackeray over mob in rally in state tour | Maharashtra Political Crisis: “तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट!

Maharashtra Political Crisis: “तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट!

Next

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. ही हानी भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. युवासैनिक आणि शिवसैनिकांची मोट बांधण्याचे जोरकस प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीवरून भाजपने वर्मावर बोट ठेवले असून, तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. 

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यापेक्षा मोठी गर्दी जमवून दाखविण्याचे आव्हानही दिले गेले. तर इकडे भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या गर्दीमागील गणित सांगत ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटात उरलेल्यांवर निशाणाही साधला आहे. गर्दी आणि सध्याची राजकीय गणिते सांगून राजकारणातील वास्तवाची स्वानुभावरून जाणीव करून देण्याचा प्रयत्नही विखे पाटील यांनी केला आहे.

ही तर कॅमेऱ्याची कमाल

सभेची गर्दी ही कॅमेऱ्याची कमालही असू शकते. ज्या पद्धतीने दाखवायचे, तसे चित्रिकरण केले असावे. अनेक राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी होते. लोकांना काय नवेपण आहे ते पाहण्याचे कुतूहल असते. ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही कितीही गर्दी केली आणि मते पडत नसतील तर त्याला अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यासंबंधी लोकसभा निवडणुकाच्या वेळचा स्वत:चा अनुभवही त्यांनी सांगितला.

आडनाव अथवा कुटुंबाच्या आधारावर मते पडण्याचा काळ आता गेला

आपले आडनाव अथवा कुटुंबाच्या आधारावर मते पडण्याचा काळ आता गेला. त्यावेळी मी खासदार झालो यात माझे आजोबा, वडील यांच्या कार्याचे योगदान ५० टक्के आहे. मात्र ५० टक्के पक्ष व स्वकर्तृत्त्वावर आपले स्थान निर्माण करावे लागते. त्यामुळे तुम्ही कोणत्या कुटुंबातील आहात. कोठून आला आहात. तुमचे वडील कोण होते, आजोबा कोण होते. या गोष्टी आजच्या राजकारणात ५० टक्केच प्रभाव करतात, असे सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, आम्हीही शिवसेनेत होतो. नंतर काँग्रेसमध्ये गेलो. पुढे भाजपमध्ये आलो. शिवसेनेचे ते ४० आमदार काही दूधखुळे नाहीत. ते तिसऱ्यांदा अथवा चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकलेले आहेत. मलाही लोकसभेत पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पाया भक्कम आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत युती होती. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटो वापरून विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उरलेल्या आमदार आणि खासदारांनी आपला राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावे, असे आव्हान विखे-पाटील यांनी दिले. 
 

Web Title: bjp mp sujay vikhe patil taunt shiv sena aaditya thackeray over mob in rally in state tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.