“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 01:14 PM2023-11-19T13:14:59+5:302023-11-19T13:15:19+5:30

Narendra Patil News: ओबीसी एल्गार सभेतून धगन भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली, असे सांगत नरेंद्र पाटील यांनी टीका केली.

bjp narendra patil replied ncp ajit pawar group chhagan bhujbal over criticism on manoj jarange patil | “जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा

“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा

Narendra Patil News: गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक नेते मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेचे समर्थन करताना छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला. 

जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण एल्गार सभा’ झाली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. यावरून छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, भुजबळांना जोरदार प्रत्युत्तरही दिले जात आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचा भाजप नेते नरेंद्र पाटील यांची खरपूस शब्दांत समाचार घेतला. 

भुजबळ पहिल्यापासून मराठा द्वेषी आहेत

छगन भुजबळ पहिल्यापासून मराठा द्वेषी आहेत. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी उभे आहोत. मनोज जरांगे यांना डिवचलं, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देत, छगन भुजबळ यांनी विविध पदांवर काम केले आहे. मराठा समाजाच्या सहकार्याने काम करत असल्याने छगन भुजबळांनी सांगितले आहे. पण, ‘ओबीसी एल्गार सभे’तून भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली आहे, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. तसेच तुम्ही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडा. आम्हाला त्याच्याशी देणे-घेणे नाही. परंतु, मनोज जरांगे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देणार, असे नरेंद्र पाटील यांनी ठामपणे सांगितले. 

दरम्यान, छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊ नये. जाती-जातीत तेढ निर्माण करू नये. मराठा समाजाने आतापर्यंत कुणाचे हिसकावून मागितले नाही. कायद्यानुसार हक्काचा वाटा मागितला आहे. मराठा आरक्षण व समाजाविरोधात कुणीही बोलू नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.


 

Web Title: bjp narendra patil replied ncp ajit pawar group chhagan bhujbal over criticism on manoj jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.