“उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 06:34 PM2023-07-22T18:34:31+5:302023-07-22T18:35:28+5:30

Raigad Irshalwadi Landslide Incident: चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले आहेत. त्याचा काही उपयोग नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

bjp nitesh rane replied uddhav thackeray over irshalwadi landslide place visit at raigad | “उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे”

“उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे”

googlenewsNext

Raigad Irshalwadi Landslide Incident: खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे, सोबतच धुके असल्याने बचाव व शोधमोहिमेला अडचणी येत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली आणि दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले. मात्र, यावरून उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. 

पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत तुम्हा सगळ्याचे पुनर्वसन होत नाही, तुमचे आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी आहोत. तसेच यामध्ये कुठेही राजकरण येऊ देणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी ग्रामस्थांना दिले आहे. याशिवाय, सध्याचे क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने त्या संदर्भात सरकारसोबत संवाद साधणार आहे. मी सरकारकडे जायला तयार आहे, यामध्ये मला कोणताही कमीपणा येणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यावर भाजप नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर देताना टीकास्त्र सोडले आहे. 

उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले

तुम्ही मुख्यमंत्री असताना काय मदत केली, याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे. ते फोटोसेशन करण्यासाठी दुर्घटनाग्रस्त भागात जात असतील. त्याचा काही उपयोग नाही. चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले आहेत. विनायक राऊत हे कोकणचे संकट आहे. मतदारांना विनंती आहे की, २०२४ मध्ये हे संकट दूर करावे, या शब्दांत नीतेश राणे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, मणिपूर घटनेतील राक्षसांना कठोर शिक्षा मिळणार आणि त्याची कारवाई सुरु झाली झाली आहे. मणिपूर घटनेवर बोलणारे विरोधी लोक जोधपूर घटनेवर बोलतील का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्यासाठी ते बोलत आहेत. या देशाला विकसित कोण करू शकतो, रक्षण कोण करू शकतो, हे भारतातील महिलांना माहिती आहे. काँग्रेसच्या महिला आमदारांनी देशातील इतर घटनांवर पण बोलावे. फक्त मोदी द्वेष आणि भाजप द्वेष करत असल्यामुळे हे असं बोललं जात आहे. तुमचे राहुल गांधी बोलण्याची हिंमत दाखवतील का? वेळ आणि तारीख सांगा आम्ही तुम्हाला सिनेमे दाखवतो, असे आव्हान नितेश राणे यांनी ठाकरे गटाला दिले.
 

Web Title: bjp nitesh rane replied uddhav thackeray over irshalwadi landslide place visit at raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.