MPSC Exam Postponed : "फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार... रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?", नितेश राणेंचा सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:29 PM2021-03-11T17:29:24+5:302021-03-11T17:51:50+5:30
BJP Nitesh Rane Over MPSC Exam Postponed : भाजपाचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
मुंबई - पुण्यात विद्यार्थ्यांनी एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बंद करा बंद करा, एमपीएससीचे गाजर दाखवणे बंद करा यासारखी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून अनेकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी "फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार... रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून वाटेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार... रात्रीच्या पार्टीमध्ये नाही??" असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे..
— nitesh rane (@NiteshNRane) March 11, 2021
मुलांचे वय कसे कमी करणार?
ह्यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून.. वाटेल ते निर्णय घेत आहेत!!!
फक्त MPSC परिक्षेमध्येच कोरोना होणार.. रात्री च्या पार्टी मध्ये नाही ??
"...आपल्याला पुढं जावं लागेल, मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष द्यावं", रोहित पवारांची विनंती
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे असं म्हटलं आहे. "यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मागील वर्षभरात कोरोना प्रादुर्भाव आणि मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा चांगलाच फटका बसला.
MPSC Exam Postponed : "MPSC ची परीक्षा ही झाली पाहिजे", रोहित पवारांची विनंतीhttps://t.co/EEbOYlzdsP#mpscexam#mpscpostpone#RohitPawar#NCP#MaharashtraGovernment#UddhavThackeray@RRPSpeaks
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021
@RohitPawarSpeakpic.twitter.com/q6K9J9iwp9
"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
येत्या 14 मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा (MPSC Exam Postponed) पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून 'एमपीएससी'च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व 'एमपीएससी'चा तीव्र निषेध व्यक्त केला.
ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सरकारविरोधात घोषणाबाजी #MPSC#MPSCexam#ThackerayGovernment#Students#Punehttps://t.co/YqV39UVYv9
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021