Nitesh Rane : ...तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?; नितेश राणेंकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:04 AM2022-07-30T11:04:34+5:302022-07-30T11:10:48+5:30

BJP Nitesh Rane And Bhagat Singh Koshyari : भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची पाठराखण केली आहे. 

BJP Nitesh Rane support governor Bhagat Singh Koshyari Over his mumbai statement | Nitesh Rane : ...तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?; नितेश राणेंकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची पाठराखण

Nitesh Rane : ...तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?; नितेश राणेंकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची पाठराखण

googlenewsNext

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेले विधान महाराष्ट्राचा अपमान करणारं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री केंद्र सरकारला पत्र लिहितील. अशाप्रकारे पुन्हा विधानं होणार नाहीत असं केंद्र राज्यपालांना कळवू शकतो. मुंबईच्या विकासाठी सर्वांचे योगदान असलं तर मुंबईच्या विकासात सर्वाधिक वाटा मराठी माणसाचा आहे ही वस्तूस्थिती आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. यानंतर आता भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची पाठराखण केली आहे. 

भाजपाचे नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी भगतसिंग कोश्यारींची बाजू घेतली आहे. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही असं म्हटलं आहे. तसेच "...तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?" असा सवाल देखील विचारला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एवढेच कशाला... तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदीकडे देऊन ठेवली आहे ते चालत का? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही??" असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

"राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही... त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे... त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी... किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..." असं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावरून परतल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटतील. मराठी माणसांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्री केंद्राला याबाबत पत्र लिहून कळवतील. मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यपाल पदावर असतात तेव्हा वादग्रस्त विधान करणं टाळलं पाहिजे. राज्यपालांच्या अशा विधानानंतर राज्यातील भावना केंद्र सरकारला कळवायला हव्यात. कदाचित राज्यपालांच्या या विधानानंतर केंद्राला पत्र लिहून भावना व्यक्त करणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री असतील असंही केसरकरांनी सांगितले आहे. 

Web Title: BJP Nitesh Rane support governor Bhagat Singh Koshyari Over his mumbai statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.