Nitesh Rane on Sanjay Raut: “अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं”: नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:17 AM2022-05-23T11:17:12+5:302022-05-23T11:18:12+5:30

Nitesh Rane on Sanjay Raut: आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरेंशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढेच येते, अशी टीका नितेश राणेंनी केलीय.

bjp nitesh rane taunts shiv sena sanjay raut at kalyan visit | Nitesh Rane on Sanjay Raut: “अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं”: नितेश राणे

Nitesh Rane on Sanjay Raut: “अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं”: नितेश राणे

Next

Nitesh Rane on Sanjay Raut: मुंबईसह राज्यभरातील महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून, भाजपविरोधात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. अयोध्या सोडा. पण संजय राऊत मुंबई-महाराष्ट्रात एकटे तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल, अशी खोचक टीका केली आहे. 

संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना महत्व द्यायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकटे अयोध्या सोडा, मुंबई-महाराष्ट्र तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल. संपूर्ण दिवस शरद पवार यांची आणि अन्य लोकांची हाजी-हाजी करुन परत एकदा खासदार झाले आहेत. राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत, अशी विचारणाही नितेश राणे यांनी केली. 

फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढेच येते

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी दिखावा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. मात्र नंतर आम्हाला समजले आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढेच येते, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली. 

दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमावरूनही नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. दिघे साहेबांचे नुसते नाव वापरायचे असेल आणि त्यांच्याविरुद्ध काम करायचे असेल तर मग चित्रपटाचा प्रमोशन का करताय? जे चित्रपटामध्ये दाखवले आहे तसेच वस्तूस्थितीमध्ये ठाण्यात कानाकोपऱ्यात काम सुरू आहे का?, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
 

Web Title: bjp nitesh rane taunts shiv sena sanjay raut at kalyan visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.