भाजपा कार्यालयाची सुनावणी १५ डिसेंबरला
By admin | Published: October 27, 2015 01:45 AM2015-10-27T01:45:41+5:302015-10-27T01:45:41+5:30
नरिमन पॉइंटवर बेकायदा उभारलेल्या भाजपा मुख्यालयाविरुद्ध करण्यात आलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणी उच्च न्यायालयाने १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
मुंबई : नरिमन पॉइंटवर बेकायदा उभारलेल्या भाजपा मुख्यालयाविरुद्ध करण्यात आलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणी उच्च न्यायालयाने १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे. मात्र तोपर्यंत भाजपाने सामान्य प्रशासन व नगरविकास विभागाकडे जागेसंदर्भात केलेल्या अर्जावर निर्णय न घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
भाजपाला २,६८६ चौ. फुटांची जागा देण्यात आली आहे, पण त्यांचे कार्यालय ९,५०० चौ. फुटांवर पसरले आहे, अशी माहिती महापालिकेने गेल्या सुनावणीवेळी दिली होती.
८ जून रोजी भाजपाने सामान्य प्रशासन विभाग आणि नगरविकास विभागाकडे जागेच्या नोंदणीसंदर्भात दुरुस्ती करण्याचे पत्र लिहिले आहे, असे म्हटले आहे. खंडपीठाने भाजपाच्या विनंतीवर निर्णय घेण्यास राज्य सरकारला स्थगिती दिली होती. सोमवारी ही स्थगिती कायम करत याचिकांवरील अंतिम सुनावणी १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे.