BJP On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:40 PM2023-02-20T20:40:48+5:302023-02-20T20:41:33+5:30

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी अमित शहांना नाव न घेता मोगॅम्बो म्हटले होते, त्यावर भाजप नेत्याने पलटवार केला.

BJP On Uddhav Thackeray: 'Uddhav Thackeray disappeared from Maharashtra politics like Mr India...' BJP leader Atul Bhatkhalkar criticizes | BJP On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका

BJP On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका

googlenewsNext

BJP Attack On Uddhav Thackeray: शिवसेना नाव आणि पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गट आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. यातच आता मिस्टर इंडिया चित्रपटातील डायलॉग वापरुन भाजपने "मिस्टर इंडिया गायब झाला" म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खलनायक वर्णन करत ‘मोगॅम्बो खुश झाला’ असे म्हटले होते. त्यावर आता भाजपने उद्धव यांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांच्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, ते स्वतः मिस्टर इंडिया बनत आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास गायब झाले आहेत. उद्धव ठाकरे भाजप नेतृत्वाला मोगॅम्बो म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना गोष्टी समजत नाहीत, तेच असे मूर्खासारखे भाष्य करतात, अशी टीका त्यांनी केली. 

उद्धव ठाकरेंनी अमित शहांना मोगॅम्बो म्हटले
उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातील प्रसारमाध्यमांनी अशा वक्तव्याबाबत विचारले असता, 'राजकारणात अशा उपमा आनंदाने स्वीकारल्या पाहिजेत," असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी रविवारी (19 फेब्रुवारी) अमित शहा यांचे नाव न घेता टोमणा मारला होता. अमित शहांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, "हा मोगॅम्बो आहे. तुम्हाला मिस्टर इंडिया चित्रपट आठवत असेल तर मोगॅम्बोला हेच हवे होते. मोगॅम्बो खूश झाला,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

शिवसेनाएकनाथ शिंदेंकडे गेली
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (17 फेब्रुवारी) उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले. या निर्णयावर उद्धव ठाकरे गोटातून टीका होत आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे स्वतः ही चांगलेच संतापले आहेत. 

Web Title: BJP On Uddhav Thackeray: 'Uddhav Thackeray disappeared from Maharashtra politics like Mr India...' BJP leader Atul Bhatkhalkar criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.