“भाजपा आरक्षणविरोधी आहे हे म्हणणे चुकीचे, महायुतीचे जागावाटप...”; पंकजा मुंडे थेट बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 10:11 PM2024-09-05T22:11:08+5:302024-09-05T22:13:11+5:30

Pankaja Munde News: सातत्याने बैठका सुरू आहेत. सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये उत्साह आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

bjp pankaja munde reaction over mahayuti seat sharing and maratha reservation | “भाजपा आरक्षणविरोधी आहे हे म्हणणे चुकीचे, महायुतीचे जागावाटप...”; पंकजा मुंडे थेट बोलल्या

“भाजपा आरक्षणविरोधी आहे हे म्हणणे चुकीचे, महायुतीचे जागावाटप...”; पंकजा मुंडे थेट बोलल्या

Pankaja Munde News: सातत्याने बैठका सुरू आहेत. लातूर, धाराशीव येथे बैठका झाल्यानंतर आता पुण्यात बैठका आहेत. सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. गेले चार पाच दिवस बैठकांचे सत्र सुरू आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना भेटत आहे. पुण्यातून आता नगर जिल्ह्यात जाणार आहे, अशी माहिती भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, संघटनेतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा, त्यांच्याशी संभाषण व्हावे, त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सक्रीयपणे काम करावे. जास्तीत जास्त मताधिक्याने महायुतीची जागा निवडून येईल. यासाठी भाजपाने एक प्रयोग केला आहे. यामध्ये मी एकटी नाही, तर अनेक नेते यात आहेत. आम्ही सगळे जण १० ते १५ मतदारसंघांमध्ये जात आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

जागावाटपाचा निर्णय महायुतीचे प्रमुख नेते घेतील

महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय हे महायुतीचे प्रमुख नेते घेतील. नक्कीच सर्व्हेक्षण होईल. काही जागांवर वेगळ्या चर्चा होतील. बाकी जिथे निर्णय घ्यायचे आहेत, तो घेऊन दिल्लीतील वरिष्ठांपर्यंत तो नेला जाईल आणि अंतिम यादी ठरेल, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. ज्या पक्षांमधून महायुतीमधून अनेक नेते निवडणूक लढायला तयार आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अशावेळी निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. चर्चा होईल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार असे जे फेक नरेटिव्ह सेट करण्यात आले होते. त्यावर मी बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीत जे काही बोलले गेले असेल, तो अंतर्गत विषय आहे. भाजपाचे सरकार आले. भाजपाचे मुख्यमंत्री होते. तेव्हा आम्ही पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही, याची संपूर्ण जबाबदारी ही जे वरच्या कोर्टात कमी पडले त्यांची आहे. याच गोष्टींवर चर्चा व्हायला हवी. भाजपा आरक्षणाच्या विरोधात आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. अशी भूमिका घेणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: bjp pankaja munde reaction over mahayuti seat sharing and maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.