Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 06:12 PM2021-04-25T18:12:02+5:302021-04-25T18:15:13+5:30

Oxygen Shortage: भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

bjp prasad lad criticises thackeray govt over oxygen shortage | Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

Next
ठळक मुद्दे‘पीएम केअर्स’मधून १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पतशी राजेश टोपे यांची इच्छा होती का? - भाजपआदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट - प्रसाद लाड

मुंबई: एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा देशाला बसत असून, दुसरीकडे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार यासाठी करत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला असून, ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला, अशी विचारणा करण्यात आली आहे. (prasad lad criticises thackeray govt over oxygen shortage)

केंद्र सरकारने ५ महिन्यांपूर्वीच राज्यासाठी १० ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. या प्लांटसाठी पीएम केअर फंडातून निधीही देण्यात आला होता. ५ महिने झाले तरी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला नाही. या प्लांटचे काय झाले? हा निधी गेला कुठे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर यासंदर्भात टीकास्त्र सोडले आहे. 

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

‘पीएम केअर्स’मधून १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

कोरोना संकटाच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये. प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात राज्य सरकारांना पत्रे पाठविली होती. त्यानुसार ‘पीएम केअर्स’ निधीतून महाराष्ट्राला १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यात या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरू केलेला नाही. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केली. 

१ मेपासून लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक; अन्यथा लस मिळणार नाही!

तशी राजेश टोपे यांची इच्छा होती का?

वसई-विरार येथील रूग्णालयाला आग लागल्याने १३ रूग्णांचा मृत्यू झाला, ही अतिशय क्लेशदायक बातमी आहे. अशा घटना घडल्यावर मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देऊन राज्य सरकारची जबाबदारी संपत नाही. एखादी बातमी ही महत्वपूर्ण व राष्ट्रीय बातमी होण्यासाठी अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची इच्छा होती का, अशी विचारणाही लाड यांनी केली आहे. 

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

आदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट

पालघर, तलासरीसारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट आहे. आरोग्य सुविधांचा तुटवडा आहेत पण सरकारच्या निर्बंधामुळे रूग्णांना जवळ असलेल्या गुजरातमधील रुग्णालयांमध्ये जाता येत नाही. तसेच तेथील डॉक्टरांना तलासरी येथे रूग्णांना उपचार देण्यासाठी येण्याची परवानगी मिळत नाही. राज्य सरकारने आदिवासी बांधवांना उपचार घेण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणीही लाड यांनी यावेळी बोलताना केली.

लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

राज्याला लाखांवर रेमडेसिवीर औषधे

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मागणीनुसार १० दिवसात ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्याला १ लाख ६५ हजार औषधे मिळाली आहेत. तसेच राज्य सरकारनेही विविध यंत्रणांच्या माध्यमातून ५ लाख औषधांची खरेदी केलेली आहे. तरीदेखील राज्यात औषधांचा तुटवडा आहे. ही औषधे कुठे गायब झाली? या औषधांचा काळाबाजार झाला का?, अशी शंका प्रसाद लाड यांनी वर्तवली आहे.
 

Web Title: bjp prasad lad criticises thackeray govt over oxygen shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.