“महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, तसे संकेतच आहेत”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 02:15 PM2021-06-05T14:15:11+5:302021-06-05T14:20:18+5:30
आता महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, असा टोला भाजपने लगावला आहे.
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप पक्ष अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या मुद्द्यांवरून भाजप ठाकरे सरकारला घेरताना दिसत आहे. आता महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, असा टोला भाजपने लगावला आहे. (bjp pravin darekar claims that maha vikas aghadi government will ever fall)
भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला होता. यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सह्याद्री अतिथी गृहाचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळतो आणि सरकारला याची माहितीही नाही. तसेच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.
वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली
भाजपला मोठा जनाधार आहे
विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचे असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी यावेळी लगावला. अनलॉकबाबत काढण्यात आलेले परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढण्यात आले. जिल्ह्यांबाबतचे निकष स्पष्टपणे दिसत नाहीत. मंदिरे उघडण्याबाबतची सरकारची भूमिका विरोधी आहे. मंदिरे उघडण्यासाठी सरकारचे मनोधैर्य का होत नाही, अशी विचारणाही दरेकर यांनी केली.
भाजपमधील कलह वाढला! दिलीप घोष यांना कार्यकर्त्यांनी घेरले; बैठकीत गोंधळ
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरही टीका केली आहे. कोरोना लसीकरणाबाबत काढण्यात आलेले ग्लोबल टेंडर रद्द झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे का? असा प्रश्न करतानाच निविदा प्रक्रियाते चांगल्या कंपन्या येणे अपेक्षित होते, असे दरेकर म्हणाले.