Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:00 PM2021-05-24T20:00:20+5:302021-05-24T20:02:21+5:30
Tauktae Cyclone: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गोवा, गुजरात या राज्यांनाही जोरदार तडाखा दिला. राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस नेते नाना पटोले यांसह अनेक नेत्यांनी कोकणचा दौरा केला. मात्र, तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. (bjp pravin darekar criticised sanjay raut on tauktae cyclone damages in konkan region)
भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून, राज्य सरकारचा अहवाल म्हणजे कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालात राज्य सरकारकडून कोकणवासीयांना काही देण्याची मानसिकता दिसून येत नाही. कोट्यवधींच नुकसान झालेलं असताना कोकणवासीयांच्या तोंडाला पानं पुसणारा अहवाल सादर करण्यात आला आहे. pic.twitter.com/EO8gu8rn2H
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 24, 2021
एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
राज्य सरकारला काही द्यायचच नाही
कोकण विभागीय आयुक्तांकडून तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालावरून राज्य सरकारला काही द्यायचच नाही, असे दिसून येत आहे. संजय राऊतांनी दोन हजार कोटींची अपेक्षा केंद्राकडून केली आहे. म्हणजे प्रथमदर्शनी संजय राऊतांना दोन हजार कोटींचं नुकसान झालं आहे असं वाटलं असावं. म्हणजे एक तर संजय राऊतांचा अभ्यास कमी किंवा शासनाची मानसिकता कोकणवासीयांना देण्याची नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य
कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसणारा अहवाल
संजय राऊतांनी केंद्राकडे २ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्य शासनातील अहवालाप्रमाणे २.३५ टक्के एवढेही पैसे होत नाहीत. नुकसान कोट्यावधीचे झालेलं आहे. त्यामुळे ४०-४५ कोटी म्हणजे कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अहवाल शासनाकडून आलेला दिसत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
माऊंट एव्हरेस्टवर १०० जणांना कोरोनाची लागण? गाइडचा दावा, नेपाळ सरकारचा इन्कार
दरम्यान, सदर अहवालात मनुष्यहानीकरता ४१ लाख, पशुधन नुकसान ६ लाख २९ हजार, घरगुती वस्तू, कपड्यांसाठी ११ लाख २९ हजार, पक्क्या-कच्च्या घरांच्या पडझडीसाठी २५ कोटी २४ लाख, जनावरांच्या गोठ्यांसाठी ३४ लाख ८४ हजार, मत्स्य व्यावसायिकांसाठी ४४ कोटी, शेती व बहुवार्षिक पिकांसाठी १६ कोटी ४८ लाख अशा प्रकारे एकूण ४७ कोटी १५ लाखाची मागणी संपूर्ण कोकणसाठी म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही मागणी झाली आहे, असे दरेकरांनी सांगितले.