“आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच खुलेआम वृक्षतोड! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 06:48 PM2021-06-06T18:48:48+5:302021-06-06T18:52:36+5:30

होर्डिंगसाठी झाडे कापली गेली, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना केला.

bjp pravin darekar criticises aditya thackeray over cutting down trees | “आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच खुलेआम वृक्षतोड! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार”

“आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच खुलेआम वृक्षतोड! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार”

Next

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. कोरोनाची स्थिती, कोरोना लसीकरण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यातच आता पुन्हा एकदा वृक्षतोडीचा मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्याच दिवशी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात खुलेआम वृक्षतोड झाल्याचे सांगत हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. (bjp pravin darekar criticises aditya thackeray over cutting down trees)

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वरळी येथे झालेल्या या वृक्षतोडीची पाहणी केली. पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल झाली. हा कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असून, याबाबत कठोर कारवाई झाली पाहिजे. होर्डिंगसाठी झाडे कापली गेली, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना केला. वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

“संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

मुंबई मनपा व पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच झाडांची अमानुष कत्तल करण्याची हिंमत वृक्षशत्रू दाखवू शकले. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला खुलेआम वृक्षतोड झाली. मुंबई भाजप अध्यक्ष एमपी लोढा यांच्यासह वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली, नागरिक आणि डीसीपी यांच्याकडून माहिती घेतली, असे प्रवीण दरेकर म्हणाले. 

“संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

होर्डिंग्ज आहेत त्याला ही झाडे अडसर ठरत होती

या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे की, होर्डिंग्ज आहेत त्याला ही झाडे अडसर ठरत होती. त्यामुळे झाडे कापण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. केवळ दोन दिवस वातावरण संतप्त आहे म्हणून, कारवाई करतोय असे दाखवून जमणार नाही. येथील नागरिकांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे सर्व पुरावे असल्याने, या आधारे दोन दिवसात संबधितांवर गुन्हे दाखल करून, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. 

“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी

अत्यंत हृदयद्रावक असे चित्र आहे

अत्यंत हृदयद्रावक असं चित्र आहे. आज एकीकडे ऑक्सिजन कमतरता व वृक्षारोपणाची आवश्यकता असताना, झाडं तोडणं हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं कृत्य आहे. याचा जाब विचारला जाईल, पोलिसांना देखील तशाप्रकारच्या कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी देखील आम्हाला कडक कारवाईबाबत शब्द दिला आहे. झाडांच्या फांद्या अडव्या आल्या व नागरिकांनी तक्रार केली तर दोन-दोन महिने वेळ नसतो. त्या फांद्या पडून घरांचे नुकसान होतं, माणसे मरतात आणि आता सकाळी कुणीतरी येते व सर्रास कत्तल करते. कोणालाही पाठीशी घालायचे कारण नाही. आम्ही कुणावरी वैयक्तिक रागापोटी आलेलो नाही. परंतु हा पर्यावरणमंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथेच जर कुंपण शेत खायला लागले. तर, शेवटी लोकांनी कुणाकडे अपेक्षेने पाहायचे. म्हणून मुंबईचे आमचे भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

Web Title: bjp pravin darekar criticises aditya thackeray over cutting down trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.