Maharashtra Political Crisis: “शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:15 PM2022-08-23T16:15:40+5:302022-08-23T16:17:01+5:30

Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांना मुंबईबाबत संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

bjp pravin darekar slams shiv sena chief uddhav thackeray over bmc election 2022 | Maharashtra Political Crisis: “शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: मुंबईसह ठाणे, पुणे आणि अन्य महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला हळूहळू सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. यातच शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि शिंदे गट एकत्रित निवडणुका लढवणार असल्याने उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेनेने २५ वर्षे मुंबई गिळली आहे. मुंबईकरांना काय दिले याचे उत्तर द्यावे, अशी विचारणा भाजपने केली आहे. 

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. मला वाटते पंचवीस वर्षे मुंबई त्यांनी गिळली. मुंबई हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे समजण्यात आले. मुंबईकरांच्या हाती काय दिले. याचे पहिले उत्तर द्या. शिंदे हे शिवसैनिक होते आणि आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट विचारांचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांना मुंबईच्या ज्या संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दररोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत

महाराष्ट्रीय राजकीय संस्कृती, परंपरा अशा प्रकारचे टोमणे. मत्सराने बोलणे हे अलीकडच्या काळात वाढत आहे. हे राजकारणाला शोभा देणार नाही. त्यामुळे ते वैफल्याने एवढे ग्रासले आहेत. त्यामुळे ते दररोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला. तसेच आताच हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणार सरकार आहे. यापूर्वीच सरकार हे अफजल खानाच्या विचाराचे सरकार होते. तशाप्रकारची सरकारची मनोवृत्ती होती, असा घणाघात दरेकर यांनी केला. 

चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे

दृष्टी तशी सृष्टी दिसते. त्यामुळे चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे. खेळाचा दर्जा देण्याची आवश्यकता असेल तर त्यांनाही दिला जाईल. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अतिवृष्टीनंतर दुसऱ्याचे दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांना मदत जाहीर केली. वेगवेगळ्या घोषणा केली. शेतकऱ्यांची काळजी घेऊ. काळजी करण्याचे काही कारण नाही. विरोधकांकडे चांगल्या सूचना असतील, त्याही स्वीकारल्या जातील. अन्यथा विरोधक त्यांचे काम करतील, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: bjp pravin darekar slams shiv sena chief uddhav thackeray over bmc election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.