राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार; अमित शहांचे संकेत

By admin | Published: June 17, 2017 05:22 PM2017-06-17T17:22:49+5:302017-06-17T17:36:14+5:30

मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत.

BJP prepares for mid-term elections; Amit Shahne's sign | राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार; अमित शहांचे संकेत

राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार; अमित शहांचे संकेत

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17- राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट  केलं आहे. निवडणुका झाल्या तर भाजप लढेल आणि जिंकेलही, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा बोलत होते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांना भाजप तयार असल्याचे संकेत दिले होते. 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची चर्चा आहे.  गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. यातच सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. यावरच अमित शहा यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी  निवडणुका झाल्याच तर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
 
पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दलही वक्तव्य केलं आहे. उमेदवाराच्या नावावर सहमतीसाठी विरोधी पक्षांची चर्चा सुरू आहे. तसंच इतर पक्षांकडून सूचना मागविण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्यावर विचार केला जाइल, असं उत्तर अमित शहा यांनी दिलं आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी भाजपाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारनं तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती दिली. सरकारवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं. महिला, आदिवासी, गरिबांसाठी आणलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात सरकारनं महत्त्वाची पावले उचलली, असंही त्यांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: BJP prepares for mid-term elections; Amit Shahne's sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.