“मनोज जरांगे यांची भूमिका अन् मागणी योग्य नाही”; भाजप नेत्यांने स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 09:54 PM2023-10-14T21:54:03+5:302023-10-14T21:54:57+5:30

Radhakrishna Vikhe Patil Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. पाठिंबा मिळत आहे. याला विरोध करण्याचे काही कारण नाही. पण...; भाजप नेते स्पष्टच बोलले.

bjp radha krishna vikhe patil said manoj jarange demand and stands not right on maratha reservation | “मनोज जरांगे यांची भूमिका अन् मागणी योग्य नाही”; भाजप नेत्यांने स्पष्टच सांगितले

“मनोज जरांगे यांची भूमिका अन् मागणी योग्य नाही”; भाजप नेत्यांने स्पष्टच सांगितले

Radhakrishna Vikhe Patil Vs Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत असून, राज्यातील ठिकठिकाणी ते सभा घेत आहेत. मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेतली. या सभेनंतर प्रतिक्रिया उमटत असून, मनोज जरांगे यांची भूमिका आणि मागणी योग्य नसल्याचे एका भाजप नेत्याने म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये टिकणारे आरक्षण हवे आहे. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यावर भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाष्य केले. 

मनोज जरांगे यांची भूमिका अन् मागणी योग्य नाही

मराठा आरक्षणास आमचा विरोध नाही, पण संबंधित आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्याची मागणी करणे योग्य नाही. मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली आहे, ती योग्य नाही. ते कधी ओबीसीतून आरक्षण मागतायत तर कधी कुणबी दाखले मागतायत. अशा वेगवेगळ्या मागण्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून पुढे येतायत. मुळात आम्हाला कुणाचे आरक्षण नको आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे, ही मागणी मराठा आंदोलकांची होती, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या काळात गायकवाड आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवला होता. त्याला स्थगिती मिळाली नाही. दुर्दैवाने मराठा समाजाचे जे आरक्षण गेले आहे, ते महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा मिळत आहे. याला कुणी विरोध करण्याचे काही कारण नाही. पण माझी अट एवढीच आहे की, आपण ओबीसीमधून जे आरक्षण मागत आहात, ते योग्य नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मराठा समाजाची मागणी स्वतंत्रपणे आरक्षण मिळाले पाहिजे, कुणाच्या आरक्षणात आम्हाला भागीदारी नको, अशी आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले. 
 

Web Title: bjp radha krishna vikhe patil said manoj jarange demand and stands not right on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.