Dahi Handi: “लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 16:11 IST2021-08-31T16:10:44+5:302021-08-31T16:11:59+5:30
Dahi Handi: राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे.

Dahi Handi: “लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका
मुंबई: देशभरात जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र, गतवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केलेले आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपने तीव्र विरोध केला असून, नियम झुगारून काही ठिकाणी दहीहंडी साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सनातन धर्म लाखो वर्षांपासूनचा आहे. आम्ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपने घेतली आहे. (bjp ram kadam criticized thackeray govt over restrictions on dahi handi celebration)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केले असून, राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे. भाजप नेते आणि आमदार राम कदम ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ED नोटिसीनंतर धावाधाव! अनिल परब घाईघाईत संजय राऊतांच्या भेटीला; १० मिनिटांत माघारी
आम्ही परंपरा खंडित होऊ देणार नाही
दहीहंडी साजरी करू नये, म्हणून ठाकरे सरकारने शेकडो पोलिसांना माझ्या घरी पाठवले! हिंदू धर्म हज़ारो वर्षांचा नाही तर लाखों वर्षांचा आहे, म्हणूनच आपण त्याला सनातन धर्म म्हणतो. आम्ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. जेव्हा अन्य धर्माच्या लोकांनी ठाकरे सरकारला सण साजरा करण्यासाठी परवानगी मागितली. कोणती अशी कारणे होती की अर्ध्या रात्री मंत्रालय उघडल्या गेले. आम्ही तर केवळ सांगतोय की पाच जणांना परवानगी द्या. पाच जणांच्या वर एकही व्यक्ती येणार नाही. ते पाचही जण सरकारला दोन्ही लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र दाखवतील. सहावा व्यक्ती जर आला तर तुम्ही आम्हाला बोला, असे राम कदम म्हणाले.
“BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावं, राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतंय”
पोलीस बळाचा गैरवापर करत असेल...
ठाकरे सरकार जर पोलीस बळाचा गैरवापर करत असेल, त्यानंतरही आम्ही घाटकोपरला जाऊ आणि दंहीहंडीचा हा उत्सव साजरा करू, असा निर्धार राम कदम यांनी केला आहे. दुसरीकडे, जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरं करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? तिथं भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात प्रवेश करुन अभिषेक केला. केली मग सत्ताधाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत का? आम्ही दहीहंडी फोडायची नाही का, अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र
मी दहीहंडी साजरी करू नये, म्हणून ठाकरे सरकारने सैकड़ो पोलिसांना माझ्या घरी पाठवले ! हिंदू वर्ष हज़ारो वर्षांचे नाही तर लाखों वर्षांचा आहे, म्हणूनच आपण त्याला सनातन धर्म म्हणतो. आम्ही ते खंडित होऊ देणार नाही !#DahiHandi#दहीहंडी#दहीहंडीउत्सव@ANI@BJP4Maharashtra@BJP4Mumbaipic.twitter.com/Hp1s23gLzo
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) August 31, 2021
दरम्यान, दहीहंडीनिमित्त मानवी मनोरे उभारू नयेत, अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने सोमवारी केलेली आहे. मात्र, ही सूचना प्रसृत करण्यात झालेला विलंब आणि त्यातील अस्पष्टतेमुळे पोलिसांना मात्र कायदा व सुव्यवस्था सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.