महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:33 IST2025-04-20T14:31:33+5:302025-04-20T14:33:19+5:30

BJP News: संघटन हेच खरे बळ या तत्त्वावर चालत भाजपाने आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

bjp ready for upcoming municipal elections new strength for party workers organizational structure strong | महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम

महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम

BJP News: भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे .राज्यभरात एकूण १२२१ मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपानं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरत आहे. संपूर्ण राज्यभर १२२१ मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत.

सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास

मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं. भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपाची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.

प्रमुख विभागवार मंडळे

- कोकण-ठाणे विभागात १८४ मंडळ
- उत्तर महाराष्ट्रात १८४ मंडळ
- पश्चिम महाराष्ट्रात २२२ मंडळ
- विदर्भात ३१३ मंडळ
- मराठवाड्यात २०७ मंडळ
- मुंबई विभागात १११ मंडळ

 

Web Title: bjp ready for upcoming municipal elections new strength for party workers organizational structure strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.