भाजपा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत?

By admin | Published: March 23, 2017 08:38 PM2017-03-23T20:38:57+5:302017-03-23T21:27:52+5:30

शिवसेनेची आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली आहे

BJP ready to make Shivsena 'Jai Maharashtra'? | भाजपा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत?

भाजपा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत?

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून सातत्याने घेण्यात येत असलेली आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांकडून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी इतर पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात घेणे किंवा थेट मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे, या पर्यायांची आज झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. 
   आज सहकारमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत  भाजपाकडून दोन पर्यायांवर चर्चा झाली आहे. शिवसेनेकडून सरकारला अडचणित आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नाराज आहेत. दरम्यान, आज झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यावधी निवडणुका आणि भाजपाच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 29 आमदारांना पक्षा प्रवेश देण्याच्या पर्यायावर चर्चा झाली.
मध्यावधी निवडणुकांसाठी किती आमदारांची तयारी आहे. तसेच मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षाची कामगिरी कशी राहील, याबाबत राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांशी सल्लामसलत केली आहे. तसेच संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांरांनी पक्षात प्रवेश देण्याचा पर्याय भाजपासमोर आहे. अशा आमदारांना भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आणून बहुमताचे गणित सोडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 
तसेच विरोधकांकडून सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत असताना अचानक कर्जमाफीची घोषणा करून त्यानंतर मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याचाही पर्याय भाजपासमोर आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.  
 

Web Title: BJP ready to make Shivsena 'Jai Maharashtra'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.