भाजपा, संघाला मराठा आरक्षण नको - राणे

By admin | Published: August 29, 2015 02:23 AM2015-08-29T02:23:25+5:302015-08-29T02:23:25+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व शिवसेना पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप

BJP, RSS do not want Maratha Reservation - Rane | भाजपा, संघाला मराठा आरक्षण नको - राणे

भाजपा, संघाला मराठा आरक्षण नको - राणे

Next

बीड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व शिवसेना पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा अभ्यासपूर्ण अहवाल बनविला होता. त्याचे कौतुक झाले. मात्र कोर्टात सरकारची बाजू मांडताना भाजपा सरकार कमी पडले. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी जसा आरक्षणाचा लढा उभा केला आहे त्या प्रकारे महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकी दाखवावी. एका बाजूला शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट ओढावले आहे तर दुसऱ्या बाजूला शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. मराठवाड्यावर एकाच वेळी सुलतानी व नैसर्गिक संकट आले आहे.
राणे यांनी शिरुर कासार तालुक्यातील खालापुरी, बीड तालुक्यातील लिंबागणेश, औरंगपुर, रुई गावांची पाहणी केली. (प्रतिनिधी)

पाणी द्या !
मालदीवच्या लोकांना विमानामार्फत पाणी नेऊन देण्याचे पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. मराठवाड्यातील लोकांना पाण्याची गरज आहे. त्यांच्याही पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी राणे यांनी केली.

Web Title: BJP, RSS do not want Maratha Reservation - Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.