भाजपने केली शिवसेनेच्या सामना मुखपत्राची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 07:31 PM2017-05-11T19:31:56+5:302017-05-11T19:32:25+5:30
सत्तेमध्ये असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राची कल्याण-डोंबवलीत जिल्हा भाजपतर्फे होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 11 : सत्तेमध्ये असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राची कल्याण-डोंबवलीत जिल्हा भाजपतर्फे होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. येथील नेतीवलीच्या टाटा पॉवर चौकात जमून भाजपने आपला निषेध व्यक्त केला.
शिवसेनेचे आमदार एकीकडे केंद्रात, राज्यात भाजपबरोबर सत्तेत आहेत. मंत्रीपदही उपभोगत आहेत मात्र तरीही शिवसेना कायम आमच्यावर विरोधी पक्षासारखी टिका करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही सामना पेपरची होळी केल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी दिली.
भाजपबरोबर सत्तेत असणारा शिवसेना पक्ष गेल्या काही महिन्यांपासून जणू काही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. याचा भाजपने यावेळी निषेध करीत शिवसेनाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून खदखदत असणारा आपला रोष बाहेर काढला.
यावेळी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक महेश पाटील, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, चंद्रकांत पाटील, नगरसेविका मनीषा खंडागळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते