Maharashtra Election 2019; भाजप-सेनेचा जाहीरनामा म्हणजे चुनावी जुमला : सुजात आंबेडकर
By Appasaheb.patil | Published: October 16, 2019 12:46 PM2019-10-16T12:46:59+5:302019-10-16T12:49:43+5:30
- सुजात आंबेडकरांनी केली भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका
सोलापूर : मागील पाच वर्षांपूर्वी भाजपने सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत़ कोणाच्याही खात्यावर १५ लाख आले नाहीत़ कोणत्याही शेतकºयांना हमीभाव दिला नाही, आत्महत्या थांबल्या नाहीत, पाणीप्रश्न सुटला नाही, धनगरांना आरक्षण दिले नाही मग यावर्षी दिलेल्या जाहीरनाम्यातील कोणत्या गोष्टी पूर्ण होतील यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही़ भाजप व शिवसेनेने जाहीर केलेले जाहीरनामे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी जुमलेच ठरणार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी केली.
सुजात आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीत उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर दौºयावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वंचित बहुजन आघाडीचा मुंबई येथे जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे़ प्रामुख्याने केजी टू पीजीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, राज्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविणे याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण बाबी ज्या राज्याचा लौकीक वाढेल त्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आल्या असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा हा जुमला ठरत नाही़ जाहीरनामा हे ठरवितो की तुमचा पक्ष कोणत्या दिशेने राज्याला घेऊन जाणार आहे़ याशिवाय तुम्ही सत्तेत आल्यावर राज्याचा किती विस्तारपणे विचार करणार आहात हे दर्शवितो; मात्र भाजप व शिवसेनेच्या सरकारने मागील पाच वर्षांपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही़ सर्वच आश्वासने राज्यातील जनतेसाठी जुमलेच ठरले.
एमआयएमसाठी सर्व दरवाजे खुलेच...
- वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची युती तुटली याबद्दल सुजात आंबेडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीची युती ही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तोडली आहे. दरम्यान, एमआयएमचे उमेदवार डॉ. गफार कादरी व वारीस पठाण या दोघा विधानसभेच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचा खुला व बिनशर्त पाठिंबा आहे. आम्हाला जर युती तोडायची असती तर आम्ही त्या दोन जागा स्वतंत्र लढलो असतो असेही आंबेडकर यांनी सांगितले. युतीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व दरवाजे खुले आहेत़ खुले असणार आहेत त्यामुळे एमआयएमने प्रेमाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करावी असाही सल्ला सुजात आंबेडकर यांनी यावेळी दिला.