भाजपा-सेनेत तणातणी
By admin | Published: June 19, 2015 02:58 AM2015-06-19T02:58:05+5:302015-06-19T02:58:05+5:30
सिडको, म्हाडा अशा मंडळांसोबतच सिद्धिविनायकसारख्या प्रतिष्ठेच्या ट्रस्टवर कोणत्या पक्षाचे किती सदस्य नेमायचे यावरून भाजपा-शिवसेना
मुंबई : सिडको, म्हाडा अशा मंडळांसोबतच सिद्धिविनायकसारख्या प्रतिष्ठेच्या ट्रस्टवर कोणत्या पक्षाचे किती सदस्य नेमायचे यावरून भाजपा-शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बरीच तणातणी झाल्याचे समजते.
कोणी, कोणती महामंडळे घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील तर शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खा. अनिल देसाई या नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यात २ : १ असे सूत्र ठरविण्यात आले असले तरीही महत्त्वाची महामंडळे कोणाला द्यायची यावर एकमत झाले नाही.
दानवे म्हणाले, आमच्यात ६६- ३३ असा फॉर्म्युला तयार झाला असून तो दोघांनाही मान्य आहे. २ : १ असे महामंडळ वाटपाचे सूत्र असेल, ज्या प्रमाणात मंत्रिमंडळाचे सूत्र आहे त्याचप्रमाणात महामंडळाचे वाटप होईल, असेही ते म्हणाले.
भुजबळांची चौकशी
तर आरआरमुळे!
भुजबळ यांच्या चौकशीला आर. आर. पाटील यांनीच परवानगी दिली होती. त्यामुळे सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र एका बाजूला खुल्या चौकशीला परवानगी द्यायची आणि दुसरीकडे आपला पक्ष अडकत आहे असे वाटून पक्षाच्या कार्यकर्त्यांना निदर्शने करायला लावायची ही राष्ट्रवादीची वृत्ती आहे, असेही दानवे म्हणाले.