भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 06:03 PM2021-01-18T18:03:59+5:302021-01-18T18:05:55+5:30

देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते?

BJP should agitate against Arnav Goswami instead of Dhananjay Munde: Rohit Pawar | भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला

भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला

Next

बारामती : देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते? हे अतिशय गंभीर आहे. भाजपने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पत्रकार अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करणे गरजे आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना लगावला.

बारामती येथे आयोजित कृषि तंत्रज्ञान सप्ताहानंतर रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत भाजपच्या वतीने आंदोलने केले जात आहेत. मुंडेंवर आरोप झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जाहीरपणे व्यक्त झाले आहेत. एखादा माणूस ज्यावेळेस व्यक्त होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये खोट नसते. पोलीस प्रशासन त्याबाबत योग्य लक्ष ठेवून आहे. एडीआर रिपोर्ट प्रत्येक आमदार खासदारांसाठी काढला जातो. आज देशभरात आपण बघितलं तर सर्वात जास्त भाजपाच्या आमदार-खासदार यांच्याविरोधात महिला अत्याचाराचे आरोप आहेत. धनंजय मुंडे यांच्याबाबत भाजप करत असलेले हे आंदोलन राजकीय हेतूने होत आहे. भाजपाने खरेतर अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. व राज्य भाजपाने केंद्राला लिखित पत्राद्वारे गोस्वामी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. गोस्वामीना गोपनीय माहिती तीन दिवस अगोदरच कशी समजते. देशाने बागलकोटवर केलेल्या हल्ल्याची गोस्वामीला तीन दिवस अगोदरच माहिती होती. एवढी मोठी गोपनीय माहिती भाजपाची बाजू घेणाऱ्या पत्रकाराला मिळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंडे ऐवजी भाजपाने गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे असे पवार म्हणाले.

ज्या लोकांनी दहा २० वर्ष गावचा विकास केला नाही. गावकऱ्यांचा आवाज दाबला जायचा. अशा गावात राष्ट्रवादीने सत्ता आणली आहे. मात्र कर्जत-जामखेड भागात जेथे-जेथे राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकली नाही. त्या भागातील ग्रामपंचायतींच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी प्रामाणिकपणे आणला जाईल. कारण शेवटी ते माझे लोक आहेत, अशी भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: BJP should agitate against Arnav Goswami instead of Dhananjay Munde: Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.