“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 15:08 IST2021-04-13T15:06:10+5:302021-04-13T15:08:04+5:30
corona virus: घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरले असावे, अशी टीका करण्यात येत आहे.

“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”
मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (corona virus) वाढती संख्या, कोरोना लसींचा तुटवडा, प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी यांवरून आता ठाकरे सरकारवर विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षांनीही टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे राज्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे सांगितले जात असून, याबाबत कधीही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात ७ जणांचा ऑक्सिनजनअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता, फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?, असा प्रश्न भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp slams thackeray govt over corona situation in the state)
भाजपकडून एकामागोमाग एक ट्विट करण्यात आले आहेत. यामध्ये ठाकरे सरकार आणि आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा यांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का?, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT आणि आरोग्यमंत्री @rajeshtope11 नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का? pic.twitter.com/H5uzYK92S1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 13, 2021
कोरोना व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी; केंद्रीय पथकाचा महाराष्ट्रावर ठपका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?
फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का? राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे रेमडेसीवीरचा काळाबाजार तर कुठे आरोग्य अधिकारीच व्हेंटिलेटरसाठी लाच घेत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मते सर्व आलबेल आहे!, असा हल्लाबोल भाजपने केला आहे.
राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स
हाच मविआ सरकारचा किमान समान कार्यक्रम
घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरलं असावं. कोरोनाचं संकट थैमान घालत असताना आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली लुटालुटीचे नवीन धंदे सुरू आहेत. आता या सर्व गोष्टीला राजाचा आशीर्वाद आहे की त्याच्या मंत्र्यांचा हे त्यालाच ठाऊक!, अशी बोचरी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”
दरम्यान, राज्यात लॉकडाऊन जाहीर केला गेला तरी सरकार सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.